शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बालाघाटच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:14 IST

बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ या मुलीशी कुकर्म करण्यात आले.

ठळक मुद्देइसासनीला सोडण्याच्या बहाण्याने यशोधरानगरात केले कुकर्म

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बालाघाटच्या एका अल्पवयीन मुलीचे झाशी राणी चौकातून अपहरण करून सामसूम ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. कामठी मार्गावरील यशोधरानगरच्या रेल्वे रुळाजवळ या मुलीशी कुकर्म करण्यात आले. पीडित मुलगी दहावीपर्यंत शिकलेली आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी पीडित मुलगी तुमसरवरून बसने दुपारी ४ वाजता नागपुरात पोहोचली. तिला नागपूरवरून वर्धा मार्गावरील इसासनी या गावाला जायचे होते. त्यासाठी ती सीताबर्डीच्या झाशी राणी चौकात आली. तेथे ती पेट्रोल पंपाच्या समोर फूटपाथवर बसली. दरम्यान २५ ते ३० वयोगटातील दोन अज्ञात युवक तेथे आले. त्यांनी तिची चौकशी केली. त्यांनी या अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये नाश्ता दिला. त्यानंतर तिला आॅटोत बसवून यशोधरानगर येथील रेल्वे रुळाजवळ पोहोचले. तेथे आरोपींनी तिच्या सोबत आळीपाळीने बलात्कार केला. तिला रात्री यशोधरानगर परिसरात सोडून ते फरार झाले. कशीतरी ती पोलीस ठाण्यात पोहोचली. यशोधरानगर पोलिसांनी तिच्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपींविरुद्ध बलात्कार, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.सीताबर्डीत तरुणांचा उपद्रवसीताबर्डीच्या व्हेरायटी चौकापासून झाशी राणी चौकापर्यंत हुल्लडबाजी करणारे तरुण अधिक आहेत. असे तरुण आणि काही दुकानात काम करणाऱ्या व्यक्ती अल्पवयीन मुली, महिलांवर नजर ठेऊन त्यांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. मागील वर्षी काटोल रोडच्या बाल वसतिगृहातून पळून आलेल्या एका अल्पवयीन मुलीला सीताबर्डीच्या एका दुकानदार आणि त्याच्या साथीदारांनी सुगतनगरच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेऊन सामूहिक बलात्कार केला होता.आरोपींना सिनेस्टाईल पकडलेपीडित मुलीने आरोपींच्या सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांची चमू डीसीपी सुहास बावचे आणि ठाणेदार पुरुषोत्तम मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित नागरिकांची चौकशी करीत होती. झाशी राणी चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही पोलिसांना आरोपींचा सुगावा मिळाला नाही. अखेर पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार काही युवकांच्या घरी शोध सुरू केला. शनिवारी दुपारी यशोधरानगरात एका संशयित आॅटोचालकाच्या घराजवळ पोलीस चौकशीसाठी पोहोचले. दरम्यान एका आॅटोचालकाला पोलिसांनी थांबविल्यानंतरही तो पोलिसांच्या चमूला कट मारून जोरात पळून जात होता. हे पाहुन पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आॅटोच्या मागे लागले. शासकीय वाहन दूर असल्यामुळे पोलीस कर्मचारी गाडीच्या मागे पळत होते. दरम्यान रस्त्यावरुन जाणाºया दुचाकी चालकांनी पोलिसांना आपल्या गाडीवर बसवून आरोपींचा पाठलाग केला. अखेर आरोपींना तीन किलोमीटर अंतरावर पकडण्यात यश आले. आरोपीत शोएब आणि इब्राहिम नावाच्या युवकांचा समावेश आहे. दोघेही आपल्या आॅटोचालक मित्राचा आॅटो घेऊन झाशी राणी चौकात गेले होते. तेथे अल्पवयीन मुलीला फिरताना पाहून त्यांची नियत बिघडली. त्यांनी तिला इसासनीला सोडण्याची बतावणी करून यशोधरानगरात आणले आणि तिच्यावर बलात्कार केला. दोन्ही आरोपींविरुद्ध अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच ते तुरुंगातून सुटले होते.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर