शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  गुन्हेगाराच्या टोळीने केली तरुणाची हत्या, तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 00:11 IST

रस्त्यावर लावलेले शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीने एका तरुणाची भीषण हत्या केली. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीपासून प्रचंड तणावाचे वातावरण होते.

ठळक मुद्देशुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून वाद : ऐन दिवाळीच्या रात्री घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्त्यावर लावलेले शुभेच्छा फलक फाडण्याच्या कारणावरून कुख्यात गुन्हेगाराच्या टोळीने एका तरुणाची भीषण हत्या केली. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्रीपासून प्रचंड तणावाचे वातावरण होते.जितेंद्र वासुदेवराव बडे (वय २९) असे मृताचे नाव असून तो संजय गांधीनगरात राहत होता. जितेंद्र बडे त्याचे मित्र रितिक धनराज डेंगे (वय २०, रा. भोलेबाबानगर) आणि अभिजित खरात हे तिघे रविवारी मध्यरात्री उदयनगर चौकात गप्पा करीत होते. तेवढ्यात तेथे प्रसाद दशरथ रोकडे (वय २५, रा. दुबेनगर) आणि त्याचे चार ते पाच साथीदार आले. त्यांनी जितेंद्रला एक फलक फाडल्याबद्दल जाब विचारला आणि तू इकडचा दादा आहे, का असे विचारत त्याच्याशी वाद घातला. बडे त्याला पोस्टर फाडण्याबाबत काही समजावून सांगत असतानाच थांब तुला दाखवतो म्हणत आरोपी रोकडे आणि साथीदारांनी जितेंद्र बडेला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर चाकूचे घाव घातले. बडेला गंभीर जखमी केल्यानंतर आरोपी पळून गेले. गंभीर अवस्थेतील बडे याला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ऐन दिवाळीच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी सकाळपासूनच संजय गांधीनगरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपींची शोधाशोध सुरू केली. हुडकेश्वर पोलिसांनी सोमवारी दुपारपर्यंत रोहण राऊत, सुमीत दहने, अभिषेक डोईफोडे आणि अनिमेश तागडे या रोकडेच्या साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू होती. तर, मुख्य आरोपी रोकडेला गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले.बडे कुटुंबीयांवर आघातआरोपी रोकडे हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध १५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तो स्वत:ला एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगून परिसरात गुंडगिरी करतो. तर, मृत बडे हा धंतोलीतील एका रुग्णालयात टेक्निशियन म्हणून काम करायचा. दिवाळीसारख्या सणाच्या दिवशी घरातील तरुणाचा असा घात झाल्याने बडे कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून