शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
3
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
4
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
5
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
6
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
7
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
8
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
9
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
10
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा
11
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
12
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
13
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
14
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
15
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
16
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
17
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
18
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
19
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
20
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून टोळीकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 22:51 IST

बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला.

ठळक मुद्देलाखो रुपये उकळले : बनावट नियुक्तीपत्र दिले१६ बेरोजगारांची तक्रार : सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्यानंतर एका टोळीने नागपुरातून पळ काढला. प्रमोद अनंतवार (रा. शांतिनगर), रोहित तभाने (वय ३६), अमित टेंभूर्णीकर (वय ३६) आणि श्रीधर भेंडे (सर्व रा. नागपूर) या चौघांनी सीताबर्डीतील लोहा पुलाजवळ इरिक्सन ग्लोबल टेक्नॉलॉजी आऊटसोर्सिंग प्रा. लि. नावाने जॉब प्लेसमेंट एजन्सी सुरू केली. बेरोजगारांना चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लावून देण्याचा उपरोक्त आरोपी दावा करीत होते. त्यांच्या या दाव्याला तिवसा (जि. अमरावती) जवळच्या समुद्रपूर गावातील दिनेश मनोहर पुनसे आणि त्यांचे १५ मित्र बळी पडले. २२ जून २०१७ ला या सर्वांना आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून त्यांची शैक्षणिक कागदपत्रे घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून वेगवेगळ्या नावाखाली २ लाख, ९६ हजारांची रक्कम उकळली. बरेच दिवस होऊनही नोकरी मिळत नसल्यामुळे पुनसे आणि अन्य त्याच्या मित्रांनी आरोपींवर दबाव वाढवला. त्यामुळे त्यांना आरोपींनी वेगवेगळ्या कंपन्यांमधील नोकरीचे नियुक्तीपत्र दिले. हे नियुक्तीपत्र घेऊन हे बेरोजगार संबंधित कंपनीच्या कार्यालयात गेले असता आरोपींनी दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी फसवणूक केल्याचे ध्यानात आल्यामुळे पीडित बेरोजगारांनी आरोपींच्या कार्यालयात धाव घेतली असता तेथे कोणताही आरोपी आढळला नाही. एवढेच काय त्यांनी त्यांचे कार्यालय बंद करून पळ काढल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी गुरुवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता आरोपींनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे आरोपी प्रमोद अनंतवार, रोहित तभाने, अमित टेंभूर्णीकर आणि श्रीधर भेंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.१५ हजारात जिल्हा समन्वयकआरोपी प्रमोद अनंतवार हा या चौकडीतील दलाल आहे. तो गावोगावच्या बेरोजगारांना हेरून त्यांच्यावर जाळे टाकायचा. तर, कार्यालयात बसलेले तभाने, टेंभूर्णीकर आणि भेंडे बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. प्रारंभी १५ हजार रुपये रजिस्ट्रेशन फी घेतली जायची. नोकरी लागल्यानंतर १५ ते २० हजार रुपये पुन्हा आम्ही एजंसीला देऊ, अशी हमीदेखिल आरोपी बेरोजगारांकडून घेत होते. केवळ १५ हजारात राज्य शासनाच्या आरोग्य विभागात ठिकठिकाणच्या आरोग्य केंद्रात जिल्हा समन्वयक किंवा जिल्हा समुपदेशक पदावर नियुक्ती करून देऊ, असे आरोपींनी पीडितांना सांगितले होते. तसे नियुक्तीपत्रही त्यांनी तक्रार करणा-या बेरोजगारांना दिले होते.वर्धा, यवतमाळचेही पीडितआरोपी प्रमोद अनंतवार, रोहित तभाने, अमित टेंभूर्णीकर आणि श्रीधर भेंडे यांनी केवळ अमरावती जिल्हाच नव्हे तर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील बेरोजगारांचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. मात्र, या फसगतीची त्यांना कल्पनाच नाही. या प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे आता पीडित तक्रारदारांची संख्या वाढू शकते, असे पोलीस सांगतात. दरम्यान, आज दुपारी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी प्रमोद अनंतवार वगळता अन्य तिघांना अटक केली. त्यांना सायंकाळी कोर्टात हजर करून त्यांचा १५ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवला. ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांच्या नेतृत्वात एपीआय प्रवीण काळे आणि त्यांचे सहकारी या आरोपींची चौकशी करीत आहेत. त्यांनी किती बेरोजगारांकडून अशा प्रकारे रक्कम उकळली, त्याचा चौकशीत खुलासा होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसcrimeगुन्हे