शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

नागपुरात एटीएम फोडणाऱ्या टोळीला खामगावात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:31 IST

नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटून मुंबईकडे पसार होणाऱ्या हरियाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या दरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून चिखली खुर्दनजीक पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळून लुटलेले ५३ लाख रुपयांसह देशी कट्टा, स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे.

ठळक मुद्देवाहतूक पोलिसांची सतर्कता : चौघांना अटक, दोन फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरातील तीन एटीएम फोडून ५५ लाख रुपये लुटून मुंबईकडे पसार होणाऱ्या हरियाणातील चार चोरट्यांना खामगाव पोलिसांनी बुधवारी सकाळी १०.१५ वाजताच्या दरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून चिखली खुर्दनजीक पकडले. पोलिसांनी त्यांच्याजवळून लुटलेले ५३ लाख रुपयांसह देशी कट्टा, स्कॉर्पिओ गाडी ताब्यात घेतली आहे.शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे कर्मचारी दिनकर राठोड, रफिक शहा, भगवान वानखडे हे तिघे नागपूर -मुंबई मार्गावरील गंगा ढाब्याजवळ पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अकोलाकडून खामगावकडे दिल्ली पासिंगची स्कॉर्पिओ सुसाट येताना दिसून आली. यावेळी वाहतूक कर्मचाऱ्यांनी सदर स्कॉर्पिओला गंगा ढाब्याजवळ थांबविण्याचा इशारा दिला; परंतु स्कॉर्पिओ न थांबता पुढे भरधाव निघून गेली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून रावणटेकडी नजीकच्या टोलनाक्याजवळ स्कार्पिओला थांबविले. पोलिसांनी चालकाला गाडीच्या कागदपत्रांची मागणी करून गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले. गाडीतील एकाने पोलिसांना देशी कट्ट्याचा धाक दाखविला व ते पसार झाले. याबाबत वाहतूक पोलिसांनी ठाणेदारांना कळविले. माहिती मिळताच शिवाजीनगरचे ठाणेदार ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांसह स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग केला. पोलीस मागे असल्याचे पाहताच चोरटे नांदुरा मार्गावरील चिखली आमसरीजवळील पुंडलीक बाबा मंदिराजवळ स्कॉर्पिओ गाडी सोडून शेतात पसार झाले. पोलिसांनी शेतामध्ये चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली. यावेळी गावकऱ्यांनीही चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांना मदत केली. मोहम्मद आजमिन मोहम्मद आसरु (२४), मोहम्मद अब्दुल मो.माजीद (२४), आसिफ हुसेन हारुन हुसेन (२५), अरशद खान रहेमान खान सर्व रा.हरियाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर एका महिलेसह दोघे आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. यावेळी पोलिसांनी स्कॉर्पिओ क्रमांक डीएल ४ सी एएफ ४९४३ मधून नगद ५३ लाख रुपये, एक देशी कट्टा, तीन जिवंत काडतुस, ६ मोबाईल, एक गॅस कटर असा माल जप्त केला आहे.सोमवारी मध्यरात्री दोन तासात तीन एटीएम फोडलेया टोळीने सोमवारी मध्यरात्री दोन तासात तीन एटीएम फोडून ५३ लाखाची कॅश घेऊन पोबारा केला होता. पॉवरग्रीड चौकाजवळील स्टेट बँकेच्या एटीएममधून ११ लाख ३५ हजर ७०० रुपये, पाटणकर चौकातील एसबीआयच्याच एटीएममधून २७ लाख २४ हजार ३०० रुपये आणि तिसऱ्या एटीएममधून १६ लाख १० हजार ६०० रुपये लुटले होते.

 

टॅग्स :Arrestअटकatmएटीएम