शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांना नागपुरात सिनेस्टाईल अटक; कारची काच फोडून माल लंपास करणारी टोळी गवसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 11:50 IST

कारच्या काचा फोडून आतमधील मौल्यवान चीजवस्तू आणि रोकड असलेली बॅग पळविणारी टोळी सीताबर्डी पोलिसांनी सिनेस्टाईल पकडली.

ठळक मुद्देसहा लाखांहून अधिक रकमेचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कारच्या काचा फोडून आतमधील मौल्यवान चीजवस्तू आणि रोकड असलेली बॅग पळविणारी टोळी सीताबर्डी पोलिसांनी सिनेस्टाईल पकडली. तिघांच्या या टोळीत एक भोपाळमधील अट्टल चोरटा असून, एका आॅटोचालकासह दोघे नागपुरातील गुन्हेगार आहेत. या टोळीकडून १० गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांसह ६ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त राकेश ओला यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली. यावेळी सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र बोरावके आणि सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनीदेखील या टोळीच्या गुन्हेगारीचा आलेख पत्रकारांसमोर मांडला.जितेंद्र रतन रामटेके (रा. पचंशीलनगर, हिंगणा रोड, नागपूर), मोहम्मद सारिक मोहम्मद युनूस (वय २६, रा. गंजीपेठ, गणेशपेठ) आणि गंगाप्रसाद भवरजी वर्मा (वय ३९, रा. टिल्लाखेडी, जि. भोपाळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, आॅटोचालक रामटेके हा या टोळीचा म्होरक्या आहे.भोपाळ जिल्ह्यातील रहिवासी वर्मा हा फूटपाथवर राहतो. फूटपाथवर झोपणाऱ्या व्यक्तींच्या खिशातील पैसे आणि मौल्यवान साहित्य तो चोरतो. नऊ महिन्यांपूर्वी त्याला चोरी करताना आॅटोचालक रामटेकेने रंगेहात पकडले. चोरीतील अर्धा हिस्सा रामटेकेने त्यावेळी त्याच्याकडून मागून घेतला. त्यानंतर वर्माची चोरीची पद्धत पाहून रामटेकेही त्याच्यासोबत चोऱ्या करू लागला. लग्नसमारंभ, रिसेप्शन अथवा दुसऱ्या कोणत्या मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणारी मंडळी आपली कार पार्किंगमध्ये जागा नसल्याने दुसऱ्या ठिकाणी दूर उभी करतात. ते हेरून आरोपी रामटेके कारच्या बाजूला आपला आॅटो उभा करायचा. वर्मा लगेच कारची काच फोडून आॅटोच्या आडून कारमधील मौल्यवान चीजवस्तू आणि बॅग काढायचा अन् हे दोघे पळून जायचे. चोरीचा माल रामटेके गंजीपेठमधील मोहम्मद सारिकला विकायचा. एप्रिल महिन्यांपासून शहरात अशा घटना अचानक वाढल्याने पोलीस दलात अस्वस्थता निर्माण झाली होती. सीताबर्डी पोलिसांकडे कारची काच फोडून रोख आणि दागिने लंपास केल्याच्या अनेक तक्रारी आल्या. त्यामुळे नोव्हेंबर २०१७ पासून पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, उपायुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांच्या नेतृत्वात दोन पोलीस पथके या टोळीचा छडा लावण्यासाठी नियुक्त करण्यात आली.या पथकाने गेल्या तीन महिन्यांमध्ये ठिकठिकाणी सापळे लावले. मात्र, ही टोळी हाती लागत नव्हती. दुसरीकडे गुन्हे सुरूच होते. १७ डिसेंबरला प्रशांत नारायण आसकर यांच्या कारमधून अशाच प्रकारे आरोपींनी सात हजारांची रोकड असलेली बॅग लंपास केली होती. सीताबर्डी ठाण्यात त्याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर पोलिसांनी नव्याने व्यूहरचना केली. ६ जानेवारीला गणेश टेकडी मार्गावर रस्त्याच्या बाजूला पोलिसांनी एक कार उभी केली. कारमध्ये मोठी बॅग होती. ते पाहून एक आॅटोचालक कारच्या आजूबाजूला रेंगाळत असल्याचे बाजूला दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या लक्षात आले. काही वेळातच आरोपी रामटेकेने आॅटो बाजूला उभा करून कारची काच फोडली. त्याचवेळी तिथे असलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला जेरबंद केले.त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने आपल्या साथीदारांची नावे सांगितली. या तिघांनी नंतर एकूण १४ ठिकाणच्या गुन्ह्यांची कुबली दिली. त्यातील १० गुन्हे सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. या गुन्ह्यात चोरलेल्या साहित्यांपैकी पोलिसांनी ७२.५ ग्राम सोन्याचे दागिने, २ लाख, ८४ हजार किमतीचे २१ मोबाईल, १ लाख, ६६ हजार, ५०० रुपये किमतीचे सात लॅपटॉप, नोट पॅड आणि पर्स तसेच आॅटो, वेगवेगळ्या बॅगसह एकूण ६ लाख, ६१ हजार, १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, अशीही माहिती उपायुक्त ओला यांनी दिली.ही कामगिरी ठाणेदार खराबे, द्वितीय निरीक्षक एस.टी. परमार, एएसआय ए. वाय. बकाल, उपनिरीक्षक एस.बी. काळे, हवालदार अजय काळे, नायक गजानन निशितकर, कमलेश गणेर, पंकज निकम, प्रकाश राजपल्लीवार, अंकुश घटी, पंकज रामटेके, अतूल चाटे यांनी बजावली.चार गुन्ह्यांतील फिर्यादींचा शोधपोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालातील सीताबर्डीच्या १० गुन्ह्यांचा छडा लागला. मात्र, अन्य जप्तीतील चार गुन्ह्यांचे फिर्यादी कोण, ते गुन्हे कोणत्या पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्याचा आणि फिर्यादींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

 

टॅग्स :Crimeगुन्हा