शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात गुलालाची उधळण एक कोटींची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:34 IST

पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देतरुण-तरुणींचा गुलालाकडे कानाडोळा : पर्यावरणपूरक गणेशोत्सव

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : काही वर्षांपासून तरुण-तरुणींमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सवाची क्रेझ निर्माण झाली आहे. सजावट ते थेट विसर्जनापर्यंत सर्वकाही निसर्गावर कोणताही ओरखडा न येऊ देता हा उत्सव साजरा करण्याकडे तरुणांचा ओढा दिसून येत आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी विसर्जनाच्या मार्गावर गुलालाचा थरच्या थर जमलेला दिसायचा. आता गुलालाची उधळण कमी पाहायला मिळत आहे. पूर्वीच्या तुलनेत गुलालाची विक्री फारच कमी झाली असून या दिवसात मुख्य बाजारपेठ इतवारीत १० ते १२ दिवसात जवळपास १ कोटीच्या गुलालाची विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.चांगल्या प्रतीचा गुलाल ६०ते ७० रुपयेठोक व्यापारी ललित आमेसर म्हणाले, इतवारी गुलालासाठी विदर्भाची मुख्य बाजारपेठ आहे. येथून गुलाल सर्वत्र विक्रीसाठी जातो. पण कालांतराने पर्यावरणपूरक संस्कृतीमुळे गुलालाच्या विक्रीत घसरण होऊ लागली. आता जवळपास १ कोटीपर्यंत उरली आहे. त्यामुळे निर्मातेही कमी झाले आहेत. नागपुरात गुलाल निर्मितीचे लघु उत्पादक जवळपास ३० च्या आसपास आहेत. पूर्वी ५० पेक्षा जास्त होते. विक्री कमी होऊ लागल्याने उत्पादनही कमी होऊ लागले. माल निर्मितीनंतर पूर्ण गुलाल विकला जाईल, याची शाश्वती नसल्यामुळे उत्पादकही फारच कमी निर्मिती करतात. गुलालाची निर्मिती स्टार्चपासून करण्यात येते. शिवाय चांगल्या प्रतीच्या रंगाच्या किमतीही महागल्या आहेत. त्यामुळे ठोक बाजारात गुलाल प्रती किलो ४० ते ४५ आणि उच्च प्रतीचा ५० ते ५५ रुपये भाव आहे. किरकोळमध्ये ६० ते ८० रुपयांदरम्यान भाव आहेत. गुलाल लाल, पिवळा, हिरवा, गुलाबी, निळा रंगात २५ किलोच्या थैलीत उपलब्ध आहे. सणांनुसार रंगाची निवड करून गुलालाची खरेदी करण्यात येत असल्याचे आमेसर यांनी सांगितले.गुलालाचे उत्पादक कमीगुलालाची निर्मिती लालगंज, शांतिनगर, नाईक तलाव, नवीन शुक्रवारी या भागात केली जाते. पूर्वीच्या तुलनेत कच्चा मालाच्या किमती आणि मजुरी वाढल्यामुळे किमती वाढल्या आहेत. उत्पादकांनी सांगितले की, कच्चा माल रोखीत खरेदी करावा लागतो. पण विकताना उधारीत द्यावा लागतो. गुलाल विक्रीचे पैसे मिळविण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते. नफाही कमी झाला आहे. भाव वाढल्यामुळे आणि पर्यावरणपूक संस्कृतीमुळे सार्वजनिक मंडळाकडून खरेदी कमी झाली आहे. याच कारणांनी अनेकांनी निर्मिती बंद केली आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार हिरावला आहे. धार्मिक कार्यात गुलालाचे महत्त्व असल्याचे उत्पादकांनी सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवnagpurनागपूर