शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

Ganesh Festival 2019; सळसळत्या तरुणाईचा गजर; ढोल-ताशा पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 11:16 IST

श्रीगणेशाच्या आगमनासोबतच ढोल-ताशांच्या गर्जनेचा ज्वर चढायला लागला असून... पयलं नमनं हो, करितो गर्जनं, अमुचं वादनं हो, श्रीगणपती अर्पणं.. असा घोष व्हायला लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्याकडील मनोवृत्ती उत्सवी प्रकारची आहे आणि जल्लोष साजरा करण्यासाठी निमित्ताची गरज येथील संस्कृतीला नाही. केवळ संधी मिळावी आणि आपला उत्साह उत्सवरूपातून प्रज्वलित करावा, ही या भूमीची परंपरा राहिली आहे. त्यात महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला आणि येथील कुठलीही परंपरा प्रथम श्रीगणेशास अर्पण असते. त्याच अनुषंगाने, गेल्या काही काळापासून ढोल-ताशांची गर्जना येथील उत्सव-महोत्सवांना वेगळीच चकाकी प्रदान करीत आहे. श्रीगणेशाच्या आगमनासोबतच ढोल-ताशांच्या गर्जनेचा ज्वर चढायला लागला असून... पयलं नमनं हो, करितो गर्जनं, अमुचं वादनं हो, श्रीगणपती अर्पणं.. असा घोष व्हायला लागला आहे.महाराष्ट्राची भूमी छत्रपतींच्या कर्तृत्वाने पावन झाली आहे. मध्यंतरी त्या कर्तृत्ववान परंपरेची मुळं जरा शिथिल पडली होती. मात्र, युवावर्गाने आपल्या उज्ज्वल परंपरेची कास धरली आणि डीजे, इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या या काळात परंपरागत ढोल-ताशांना नवसंजीवनी देत, देशातच नव्हे तर जगभराला भुरळ पाडली आहे. आजघडीला एकट्या नागपुरात ४० हून अधिक ढोल-ताशा पथकांची शृंखला निर्माण झाली असून, खास नागपूरकर पथकांना वादनासाठी देशभरातून आमंत्रणे धाडली जात आहेत. गेल्या तीन महिन्यापासून या पथकांनी खास श्रीगणेशोत्सवासाठीची तयारी केली आहे. ही सगळी पथके आपले पहिले वादन श्रीगणेशास अर्पण करून, पुढे देशभरात मराठमोळ्या संस्कृतीची गर्जना करण्यास सिद्ध झाले आहेत. नागपुरात गेल्या वर्षी ३२ पथकांची नोंद होती. त्यात या वर्षात आणखी सात-आठ पथकांची भर पडली असल्याचे दिसून येत आहे.वर्तमानात स्वराज्य गर्जना ढोल-ताशा पथक, शिवप्रतिष्ठा ढोल-ताशा पथक, गजवक्र ध्वज पथक, विठुमाऊली वाद्य पथक, बेधुंद ढोल-ताशा पथक, शिवमुद्रा ढोल-ताशा पथक, शिवसाम्राज्य ढोल-ताशा पथक, श्रीराम राज्य ढोल-ताशा पथक आदी पथके देशभरात आपला डंका पिटत आहेत. मौदा, कोराडी, सावनेर अशा तालुक्याच्या ठिकाणीही ही पथके निर्माण झाली असून, संपूर्ण जिल्हा श्रीगणेशोत्सवात ढोल-ताशाच्या गजरात नर्तन करणार आहे.बेधुंद ढोल-ताशा पथकपंकज बोरकर व श्रेय फाटे यांच्या संकल्पनेतून २०१४ मध्ये हे पथक आकाराला आले. आजघडीला या पथकात ११० वादक वेगवेगळ्या क्षेत्रातून हौसेखातर दररोज एकत्र येतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीला मथुरेतील रंग महोत्सवात, हैदराबाद आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेमध्ये हे पथक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, पथकाद्वारे गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कायम पुढाकार घेतला जातो. श्रीगणेशोत्सवातून मिळणारा निधी पूरग्रस्तांसाठी वाटला जाणार असल्याची माहिती पथकाचे व्यवस्थापक अमेय पाण्डे यांनी दिली. यंदाच्या महोत्सवात विशेषत्वाने ५१ ध्वज नाचवण्यासोबतच झांजचा कर्षण घुमणार आहे.श्रीराम राज्य ढोल-ताशा पथकमंदार सुगवेकर व मंदार गढीकर यांनी या पथकाची स्थापना २०१८ मध्ये केली. आजघडीला १५० हून अधिक तरुण-तरुणी या पथकात सामील आहेत आणि एका वर्षातच वेगवेगळ्या ठिकाणी वादनाचे अनेक कार्यक्रम या पथकाने केले आहेत. श्रीगणेशाच्या आगमनापासून यंदाच्या मोसमातील वादनाचा कार्यक्रम निनादणार असल्याचे ताशा प्रमुख गौरव कोल्हे व सदस्य क्षितिज वासनिक यांनी सांगितले.शिवमुद्रा ढोल-ताशा पथकस्वत:चे स्वतंत्र असे महिला पथक असणारे शिवमुद्रा ढोल-ताशा पथक हे विदर्भातील पहिले पथक आहे. जयंत बैतुले यांच्या संकल्पनेतून २०१३ मध्ये हे पथक आकाराला आले. वर्तमानात बैतुले यांच्यासह गजानन जोशी, पराग बागडे, अमित पाण्डे व जय आस्कर या पथकाचे नेतृत्व करीत आहेत. पथकातील तरुणांची एकूण संख्या ३१५ असून, त्यात १०६ मुलींचा समावेश आहे. एकाच समूहात फाटे नकोत म्हणून, हे पथक एका वेळी एकच कार्यक्रम करते आणि त्यात संपूर्ण टीम सहभागी असते. दिल्ली, आगरा, जयपूर, राजस्थान आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी या पथकाने प्रवास केला असून, या वर्षातही अनेक ठिकाणाहून आमंत्रणे प्राप्त झाल्याचे जय आस्कर यांनी सांगितले.शिवसाम्राज्य ढोल-ताशा पथकगणेश डोईफोडे यांनी २०१५ मध्ये या पथकाची स्थापना केली आणि आजघडीला या पथकात ८८ युवक-युवतींचा समावेश आहे. संपूर्ण गणेशोत्सवातील त्यांच्या तारखा निश्चित झाल्या असून, यंदाच्या श्रीगणेशोत्सवासाठी या पथकाने विशेष अशा श्लोकांवर आधारित वादनाची तयारी केली आहे. त्यात हनुमंत, गणपती, श्रीराम, विठ्ठल, शिवराय आदींच्या स्तुतींची लय वादनात असणार आहे. श्रीगणेश विसर्जनासाठी हैदराबाद येथील कलिंगनगर व तेलंगणा येथील वारांगलतर्फे आमंत्रण या पथकाला मिळाले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव