शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गाेंदिया ९.४, नागपूर १० डिग्री; उत्तर-मध्यच्या थंड लाटेत विदर्भ गारठला

By निशांत वानखेडे | Updated: December 11, 2024 19:02 IST

Nagpur : आठवडाभर प्रकाेप, पारा आणखी घसरणार

निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : सध्या राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, साैराष्ट्रच्या भागात थंडीची लाट आली आहे.  उत्तरेकडून वाहत येणाऱ्या थंड वाऱ्याने विदर्भालाही गारठवून साेडले आहे. तीन दिवसापासून तापमान घसरण्याचे सत्र सुरू असून बुधवारी त्यात माेठी घसरण झाली. विदर्भात गाेंदियामध्ये सर्वात कमी ९.४ अंश, तर नागपूर व वर्ध्यात १० अंश तापमानाची नाेंद झाली, जी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात निचांकी नाेंद आहे. त्यामुळे नागरिकांना जबरदस्त थंडीचा सामना करावा लागत आहे.

डिसेंबरचा पहिला संपूर्ण आठवडा ढगाळ वातावरणामुळे थंडीविनाच गेला. दुसऱ्या आठवड्यात मात्र थंडीने रंग दाखवायला सुरुवात केली आहे. पहिल्या तिनच दिवसात तापमान ८ ते १० अंशाने खाली घसरले. नागपूरला रविवारी १९.४ अंशावर असलेला पारा साेमवारी १६ अंश, मंगळवारी ४ अंशाने घसरून १२ अंशावर आणि बुधवारी पुन्हा २ अंशाची घसरण हाेत १० अंशावर आला. गाेंदिया व वर्ध्यात याच फरकाने किमान तापमानात घसरण झाली. गडचिराेलीतही १०.४ अंश तापमानाची नाेंद झाली आहे. भंडारा ११.४, ब्रम्हपुरी ११.१ आणि चंद्रपूरला पारा १२ अंशावर आला आहे.

किमान तापमानात अशाप्रकारे घसरण झाल्याने थंडीचा तडाखा बसला आहे. रात्री व पहाटेच्या वेळी प्रचंड हुडहुडी भरत असून घराबाहेर पडणे त्रासदायक ठरत आहे. सूर्यकिरणे जमिनीवर पाेहचेपर्यंत बाहेर पडायला पाय धजावत नाही. दिवसाचे तापमानही सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने कमी असल्याने दिवसासुद्धा गारव्याची जाणीव हाेत राहते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार थंडीचा हा प्रकाेप पुढचे १० दिवस म्हणजे २० डिसेंबरपर्यंत जाणवत राहणार आहे. या काळाता तापमान स्थिर किंवा आणखी घसरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Winter Care Tipsथंडीत त्वचेची काळजीnagpurनागपूरgondiya-acगोंदिया