शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एकसंघ राहण्याचा गांधी-चतुर्वेदींचा काँग्रेसजनांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:12 IST

नागपूर : प्रदेश काँग्रेसवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी गुरुवारी सत्कार केला. या सोहळ्यात ...

नागपूर : प्रदेश काँग्रेसवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी गुरुवारी सत्कार केला. या सोहळ्यात काँग्रेसला जुने दिवस आणायचे असतील, महापालिकेवर सत्तेचा झेंडा फडकवायचा असेल तर एकसंघ रहा, असा सल्ला मान्यवरांकडून देण्यात आला. मात्र, दुसरीकडे याच सत्कार सोहळ्याला मुत्तेमवार-ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दांडी मारल्याचे पहायला मिळाले.

शंकरनगर चौकातून राष्ट्रभाषा संकुलात आयोजित छोटेखानी सोहळ्यात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, ज्येष्ठ नेते अनंतराव घारड, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, रामकिशन ओझा, नरू जिचकार, संदेश सिंगलकर, कमलेश समर्थ, तक्षशिला वाघधरे, नंदा पराते, रवींद्र दरेकर, हैदरअली दोसानी आदींचा सत्कार करण्यात आला. मात्र, मुत्तेमवार-ठाकरे गटाचे उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, संजय महाकाळकर, प्रा. विजय बारसे यांनी मात्र वेगवेगळी कारणे देत दांडी मारली. या सर्वांची अनुपस्थिती उपस्थितांनाही खटकली. त्यामुळे भविष्यातही गटबाजी थांबेल याबाबतच शंकाच आहे. प्रास्ताविक अतुल कोटेचा यांनी केले. श्रीराम काळे यांनी आभार मानले.

ईडी, सीबीआयने त्रास दिला तरी काही बिघडत नाही : चतुर्वेदी

- काँग्रेसला भाजपच्या विचारधारेसोबत लढतानाच त्यांचे नेटवर्क व आर्थिक ताकदीशीही लढावे लागेल. आपले लक्ष्य भाजप असायला हवे. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार नव्हे. ईडी, सीबीआयने कितीही त्रास दिला तरी काही बिघडत नाही. जो तुरुंगात गेला तो हिरो बनला, असा इतिहास आहे. लोकांना दमन आवडत नाही. त्यामुळे चिंता न करता काँग्रेस बळकट करण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी केले. काँग्रेसने आपल्याला खूप काही दिले. आता निवडणूक लढायची नाही. काही मागायचे नाही. पक्षाचे कर्ज फेडायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी-फडणवीस हे उत्तर-दक्षिण ध्रुव : गांधी

- भाजप नेते नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस यांच्यातील संबंध उत्तर व दक्षिण धुव्रासारखे आहेत. हे काही आता लपून नाही. मात्र, पक्षाच्या बैठकीत ते एकत्र असतात. एकत्रित निर्णय घेतात, असे सांगून गिरीश गांधी यांनी गडकरी-फडणवीसांमधील वाढत्या दरीवर बोट ठेवले. सोबतच पक्षासाठी त्यांच्या एकीचे उदाहरण देत काँग्रेस कार्यकर्त्यांनीही काही बाबी न पटल्यास प्रसार माध्यमांकडे धाव घेण्याऐवजी पक्षाकडे मत नोंदवावे, असा सल्ला दिला. महापालिकेच्या निवडणुकीत गटतट, वाद बाजूला सारा. आपल्या माणसाला तिकीट मिळाले नाही म्हणून पक्षाचा उमेदवार पाडू नका, उलट वॉर्डनिहाय जबाबदारी स्कीकारा, असा सल्लाही गांधी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दिला.

गटबाजी सोडून काम करा- घारड

- प्रदेश काँग्रेसवर अनेकांना संधी मिळाली. अनेक कर्मठ कार्यकर्त्यांची नावे राहून गेली. मात्र, पद असो वा नसो पक्षाचे काम करा. काँग्रेसमध्ये नागपूर शहराला एक वेगळे महत्त्व आहे. गटबाजी बाजूला सारून एकत्र या व महापालिका जिंका, असे आवाहन ज्येष्ठ नेते अनंतराव घारड यांनी केले.

आधी नेत्यांनी एकत्र बसावे : ओझा

नागपुरात नेत्यांच्या भांडणात काँग्रेसच्या पुढील तीन पिढ्या भुईसपाट झाल्या आहेत. नेते एकत्र बसल्याशिवाय महापालिकेची निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे कुणाचे पाय पकडायचे असतील तर सांगा, आम्ही तेही करू पण आधी नेत्यांनी आपली भूमिका बदलावी, अशी रोखठोक भूमिका रामकिशन ओझा यांनी मांडली.