शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
4
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
5
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
6
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
7
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
8
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
9
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
10
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
12
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
13
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
14
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
15
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
16
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
17
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
18
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
19
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
20
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक

नागपूर जिल्ह्यातील नरखेड भागात कुख्यात पिंटू रेवतकरचा गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:34 IST

घरफोडी, डकेती, चोरी व वर्धा जिल्ह्यात दारू पुरवठाच्या व्यवसायातील चढाओढीतून निर्माण झालेल्या वैमनस्यातून कुख्यात पिंटू ऊर्फ प्रमोद प्रभाकर रेवतकरची बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे नरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देअवैध धंद्याच्या चढाओढीतून हत्या : एक आरोपी अटकेत

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर ( नरखेड ): घरफोडी, डकेती, चोरी व वर्धा जिल्ह्यात दारू पुरवठाच्या व्यवसायातील चढाओढीतून निर्माण झालेल्या वैमनस्यातून कुख्यात पिंटू ऊर्फ प्रमोद प्रभाकर रेवतकरची बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे नरखेड तालुक्यात खळबळ उडाली आहे.प्रतिस्पर्धी गटातील कुख्यात सतीश जाधव व त्याच्या दोन साथीदारांनी वडाउमरी येथे पिंटूचा गेम केला. मृत व आरोपी यांच्यावर चोरी, घरफोडी, डकेती, दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सतीश जाधव याला गुरुवारी सकाळी काटोल येथून ताब्यात घेतले.मृत पिंटू रेवतकर हा बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान प्लॅटिना मोटर सायकलवर वडाउमरी गावामध्ये फिरत असताना अचानक सतीश जाधव, वैभव जाधव रा. खेडी कर्यात व हेमराज बाभुलकर रा. तिनखेडा यांनी पिंटूवर हल्ला केला. धोका दिसताच पिंटू मोटरसायकल सोडून गावाच्या बाहेर पळायला लागला. तिघांनी त्याचा पाठलाग करून त्याला गावाबाहेरील नाल्याजवळ गाठले. आरोपींनी पिंटूच्या डोके,पोट व हातावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर पळ काढला. गावाकडे येणाऱ्या रवी भैसे याला पिंटू नाल्यात रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्याने पिंटूचा भाऊ गणेश याला याबाबत माहिती दिली. गणेश लागलीच घटनास्थळी दाखल झाला तेंव्हा पिंटू शेवटच्या घटका मोजत होता. त्याने मृत्यूपूर्वी हत्या करणाऱ्यांची नावे गणेशला सांगितली. गणेश रेवतकर याच्या तक्रारीवरून नरखेड पोलिसांनी आरोपी सतीश जाधव (५३) त्याचा मुलगा वैभव सतीश जाधव (२२) रा. खेडीकर्यात व हेमराज गजानन बाभुळकर (४०) रा. तिनखेडा यांच्या विरुद्ध भांदविच्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सतीश जाधवला ताब्यात घेतले आहे. इतर दोन आरोपीचा पोलीस पथक शोध घेत आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे,धनराज भूक्ते, नितेश पुसाम, मिलिंद राठोड, राजेश हावरे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून