शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 22:11 IST

रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या पाचपावलीतील शिंदेकर बंधूंकडे पोलिसांनी छापा घालून २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह एकूण ५ लाख, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

ठळक मुद्देनागपूरच्या पाचपावली पोलिसांचा छापा : २६ जुगारी जेरबंद, सव्वापाच लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रमी क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा चालविणाऱ्या पाचपावलीतील शिंदेकर बंधूंकडे पोलिसांनी छापा घालून २६ जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख आणि साहित्यासह एकूण ५ लाख, २४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली.पाचपावलीतील नंदागिरी मार्गावरील महादेव मंदिराजवळ पांडुरंग शिंदेकर यांची जिम व बहुद्देशीय संस्था आहे. या संस्थेतर्फे रमी क्लब चालविला जातो. वरकरणी रमी क्लबचे (मनोरंजन) नाव असले तरी तेथे पैशाचा जुगार चालतो. ही माहिती कळल्याने पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी पहाटे १. २० च्या सुमारास तेथे छापा घातला. यावेळी तेथे विनोद पांडुरंग शिंदेकर (वय ४२) आणि त्याचा भाऊ नरेंद्र पांडुरंग शिंदेकर (वय ५०), गुड्डू नारायण मुलपुरी (वय ५०, रा. खलासी लाईन सदर), जितेंद्र शामराव हेडावू (वय ३४, रा. संभाजी रोड, टिमकी) आणि सफीर बेग मुस्ताक बेग (वय ३०, रा. मोहम्मद अली कॉलेजसमोर, कळमना) तसेच २१ साथीदार जुगार खेळताना आढळले. पोलिसांचा छापा पडल्याचे लक्षात येताच जुगाºयांनी पळून जाण्यासाठी धडपड केली. मात्र, पोलिसांनी आधीच घेराबंदी केल्यामुळे २६ जुगारी हाती लागले. त्यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १२,४०० रुपये, जुगाराचे साहित्य, मोबाईल आणि वाहने असा एकूण ५ लाख, २४ हजार, ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम, सहायक निरीक्षक एस. सुरोशे, उपनिरीक्षक गोडबोले, खंडार, हवलदार संतोष ठाकूर, रामेश्वर कोहळे, दिनेश भोयर, नायक विनोद बरडे, अमित सातपुते, अरुण बावने, अभय साखरे, नितीन धकाते, नितीन वर्मा, सुमीत बावनगडे यांनी ही कामगिरी बजावली.मनोरंजनाचा गोरखधंदाशहरात अशा प्रकारचे अनेक क्लब आहे. मनोरंजनाच्या नावाखाली क्लबचे व्यवस्थापक धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करतात. त्यांच्याकडून तसेच पोलिसांकडून मिळवलेल्या परवानगीनुसार, रात्री १०. ३० पर्यंत हे क्लब सुरू असायला पाहिजे. मात्र, क्लबचे संचालक तेथे रात्रंदिवस जुगार अड्डा चालवितात. गेल्या वर्षी अशाच प्रकारे परिमंडळ चारमधील क्लबमध्येही अशीच कारवाई झाली होती.

टॅग्स :Policeपोलिसraidधाड