लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेने कपिलनगर ठाण्याच्या परिसरात रम्मी क्लबच्या आड सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १७ आरोपींना अटक केली आहे. कपिलनगर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या या अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.कपिलनगरच्या पिवळाी नदी परिसरात सुरेश महाजन यांचे घर आहे. या घरात राजु पाल बहुजन सांस्कृतिक मित्र मंडळाच्या नावे रम्मी क्लब चालवित होता. पाल रम्मी क्लबच्या नावे जुगार अड्डा चालवित होता. पाल पुर्वी पारसकडे काम करीत होता. पारसच्या मृत्युनंतर तो हा अड्डा चालवित होता. पाल याचे व्यक्ती ग्राहकांना प्लॉस्टिकचे टोकन देऊन आत प्रवेश देत होते. त्यांच्याजवळ ५० रुपये ते १ हजारापर्यंत टोकन राहत होते. जुगार खेळण्यासाठी ग्राहक टोकनचा वापर करीत होते. जुगार खेळल्यानंतर ग्राहक टोकन घेऊन पैसे परत घेत होते. सकाळी ५ पर्यंत हा अड्डा सुरु राहत होता. याची गुन्हे शाखेला माहिती मिळाली. गुन्हे शाखेने रविवारी रात्री १.३० वाजता या अड्ड्यावर धाड टाकली. त्यात १७ जण रंगेहात सापडले. यात राजु पालसह अब्दूल अलीम अब्दूल अजीज, अफरोज खान मंजूर खान, लटारु डोमाजी पोरकुटे, मो. खलील जलील अंसारी, नवाब उर्फ नब्बू छोटे साहब अशरफी, मुजबमीर अहमद रियाज अहमद, आकाश रामू गुप्ता, मो. सलील अब्दूल शकुर, जावेद खान गफ्तार खान, मो. नसीर उल बसर, सैयद समीर, सैयद अशरफ, मो. शाहीद जैनुल आफदीन, अब्दूल रहीम अब्दूल करीम, प्रशांत वामन धकाते, शेख एहतेशाम शेख मेहबूब तसेच किशोर गौरखेडे यांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनोद चौधरी, पंकज घाडगे, हवालदार प्रशांत लाडे, अरूण धर्मे, नायक शिपाई श्याम कडू, शेख फिरोज तसेच राजू पोतदार यांनी पार पाडली.
नागपुरात रम्मी क्लबच्या आड जुगार अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 23:42 IST
गुन्हे शाखेने कपिलनगर ठाण्याच्या परिसरात रम्मी क्लबच्या आड सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून १७ आरोपींना अटक केली आहे. कपिलनगर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या या अड्ड्यावर धाड टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे.
नागपुरात रम्मी क्लबच्या आड जुगार अड्डा
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : सुत्रधारासह १७ जणांना अटक