शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

नक्षलवादी संघटनेचे नेतृत्व गगन्नाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:12 PM

छत्तीसगडमधील सुकमा येथील किस्टाराम परिसरात नक्षलवाद्यांनी मंगळवारी मोठा घातपात घडवून आणला होता. त्यात काही सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. हा हल्ला म्हणजे नक्षलवाद्यांकडून भविष्यात होणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा इशारा मानण्यात येत आहे.

- फहीम खाननागपूर -  छत्तीसगडमधील सुकमा येथील किस्टाराम परिसरात नक्षलवाद्यांनी मंगळवारी मोठा घातपात घडवून आणला होता. त्यात काही सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. हा हल्ला म्हणजे नक्षलवाद्यांकडून भविष्यात होणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा इशारा मानण्यात येत आहे. दरम्यान, विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी संघटनांचा वर्तमान महासचिव गणपती गुडघेदुखीमुळे त्रस्त असून, त्याची जागा नंबाला केशवराव (गगन्ना) याने संघटनेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. केशवराव याने नक्षलवादी संघटनेची सूत्रे स्वीकारल्याची माहिती मिळाल्यापासून सुरक्षा दलांच्या चिंतेत वाढ झाली आहे.  गगन्ना याने नक्षली संघटनेची सूत्रे हाती घेतल्याने चिंता वाढण्याचे कारण म्हणजे त्याने संघटनेत मिलिट्री कमिशनचा इन्चार्ज म्हणून काम पाहिलेले आहे. त्याला संघटनेतील सर्वात धोकादायक नेता मानले जाते. तसेच वेगवान आणि धोकादायक कारवायांसाठी तो ओळखला जातो. त्याउलट गणपती हा बऱ्यापैकी शांत स्वभावाचा होता. त्यामुळेच सुरक्षा यंत्रणाची चिंता वाढली आहे. गणपती आजारी असल्याने गगन्नाने संघटनेची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. मात्र त्याच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्याच्या नावावर अंतिम मोहोर ही केंद्रीय कमिटीच्या बैठकीत लागणार आहे.  

टॅग्स :naxaliteनक्षलवादीnagpurनागपूर