शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

गफ्फार अली खुनातील शूटरला बंगालमध्ये अटक

By admin | Updated: June 21, 2014 02:44 IST

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग औरंगजेब चौक येथे कुख्यात समशेरचा भाऊ गफ्फार अली रमजान अली ..

नागपूर : नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग औरंगजेब चौक येथे कुख्यात समशेरचा भाऊ गफ्फार अली रमजान अली याच्यावर देशीकट्ट्यातून गोळ्या झाडून त्याचा खून करणाऱ्या आणि अन्य दोघांना जखमी करणाऱ्या दोन फरार शूटरपैकी एकाला पश्चिम बंगालमध्ये अटक करून नागपुरात आणण्यात आले. त्याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. सी. गवई यांच्या न्यायालयात हजर करून त्याचा २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त करण्यात आला. मिनारूल इस्लाम रमजान मंडल (२४), असे आरोपीचे नाव असून तो पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातील डोमकल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुचियामोडा येथील रहिवासी आहे. त्याचे दोन साथीदार अमान मंडल आणि अनवर अब्बू बकर मंडल हे अद्याप फरार आहेत. आतापर्यंत या खुनात मिनारूलसह कलीम खान तसलीम खान, त्याचा भाऊ अलीम खान, महफूज अहमद कबुल हसन, अशा चौघांना अटक करण्यात आलेली आहे. गफ्फारच्या खुनातून फरार झाल्यानंतर मिनारूल याला मुर्शिदाबाद पोलिसांनी देशीकट्ट्यासह अटक केली होती. ही माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी मुर्शिदाबादच्या न्यायालयात या आरोपीचा स्थानांतर आदेश प्राप्त केला आणि त्याला बेहरमपूर कारागृहातून ताब्यात घेऊन आज सकाळी नागपुरात आणले. गफ्फार अलीच्या खुनाची घटना २५ फेब्रुवारी २०१४ रोजी सायंकाळी ६.२५ वाजताच्या सुमारास हसनबागच्या औरंगजेब चौकातील गफ्फारच्या चहा टपरीजवळ घडली होती. वाठोडा येथील जमिनीच्या वादातून गफ्फार अली याच्यावर चार गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आला होता. याशिवाय इब्राहिम खान अकबर खान रा. हसनबाग आणि संजित अशोक दमाहे रा. गिड्डोबानगर वाठोडा यांच्यावरही गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, वाठोडा येथील जमीन समशेर अली आणि इतरांनी विकत घेण्याचा मूळ मालकासोबत करारही केला होता. त्यानंतर ही जमीन समशेर अली याने कलीम खान याला विकली होती. पुढे ही जमीन कलीम खान याने आपला जावई अब्रार याच्या नावे स्थानांतरित करून दिली होती. कलीम खान आणि इतरांनी याच जमिनीचा विक्री करारनामा संजय अवचट याच्यासोबत केला होता. या सौद्यानंतर समशेरने कलीम खान याच्याकडून खंडणी वसूल करण्याचा सपाटा सुरू केला होता. परिणामी समशेरचा कायमचा काटा काढण्याची योजना कलीम आणि अलीम खान यांनी आखली होती. या कटात त्यांनी महफूज अहमद याला सामील केले होते. आपल्याच एका बांधकामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या अमान मंडल याला कलीमने आपल्या योजनेबाबत सांगितले होते. पश्चिम बंगाल मुर्शिदाबादचा मूळ रहिवासी असलेल्या अमान याने मिनारूल आणि अनवर या शॉर्प शूटर्सना सुपारी देऊन नागपुरात आणले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी गोळ्या झाडून गफ्फारचा खून तर अन्य दोघांना गंभीर जखमी केले होते. त्यानंतर कलीम खान याने मारेकऱ्यांना पैसे देऊन पसार केले होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक डी. एस. ढोले यांनी आरोपी मिनारूल याला न्यायालयात हजर केले. आरोपीच्या अन्य दोन साथीदारांना अटक करावयाची आहे आणि आणखी एक अग्निशस्त्र जप्त करणे आहे, आदी मुद्दे उपस्थित करून आरोपीचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला. (प्रतिनिधी)