शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी यांनी केली श्रीरामांची पूजा, रामरक्षेतून रामनामाचा जप

By योगेश पांडे | Updated: January 22, 2024 16:13 IST

योगेश पांडे - नागपूर   नागपूर : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा समारंभ सुरू असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ...

योगेश पांडे - नागपूर नागपूर : अयोध्येत प्राणप्रतिष्ठा समारंभ सुरू असताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात निवासस्थानी तसेच मंदिरांमधध्ये रामपुजन केले. त्यांच्या निवासस्थानी विशेष पुजेचे आयोजन करण्यात आले होते व रामरक्षेतून त्यांनी रामनामाचा जप केला.

सकाळी गडकरी यांच्या निवासस्थानी आयोजित पूजेमध्ये नितीन गडकरी सहभागी झाले. यावेळी त्यांनी रामरक्षा, हनुमान स्तोत्र पठण तसेच श्रीरामाची आरती केली. यावेळी त्यांच्या पत्नी कांचन गडकरी व संपूर्ण गडकरी कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. यावेळी सोनुताई अग्निहोत्री मूकबधिर शाळेचे विद्यार्थी देखील उपस्थित होते. त्यानंतर पोद्दारेश्वर राम मंदिर, खामला येथील जनसंपर्क कार्यालय आणि बजेरिया येथील अवध महोत्सवातदेखील गडकरी यांनी हजेरी लावली.पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये त्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले.

- स्वप्नपूर्ती झाली, रामराज्याच्या दिशेने पाऊलअयोध्या धाममध्ये कोट्यवधी भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य-दिव्य मंदिराचे बांधकाम आणि श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा हे रामराज्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. याबद्दलचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवतजी आणि सर्व संतांच्या उपस्थितीत श्रीरामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला आणि सर्व भारतीयांचे स्वप्न साकार झाले. हजारो कारसेवक आणि रामभक्तांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली. प्रभू श्रीरामाच्या या मंदिरासाठी शतकानुशतके झगडणाऱ्या आणि त्याग करणाऱ्या सर्व कारसेवकांप्रति मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरBJPभाजपा