शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी ‘ॲक्शन मोड’मध्ये, नऊ दिवसांत राज्यात ५० सभा

By योगेश पांडे | Updated: November 6, 2024 22:39 IST

- योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे राज्याच्या निवडणूक प्रचारात सक्रियपणे उतरणार असून ...

- योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे राज्याच्या निवडणूक प्रचारात सक्रियपणे उतरणार असून नऊ दिवसांतच त्यांच्या ५० सभांचे नियोजन करण्यात आले आहे. ७ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत या सभा होतील. याशिवाय १६, १७ व १८ नोव्हेंबर रोजीदेखील त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानसभेच्या प्रचाराच्या रिंगणात महायुतीच्या प्रचारासाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची फौजच उतरविण्यात आली आहे. एकेकाळी राज्याचे विधीमंडळ गाजविणारे गडकरी हे राज्याच्या सर्वच भागात फिरून प्रचारसभांना संबोधित करतील. प्रदेश भाजप कार्यालयाने त्यांच्या सभांचे नियोजन केले आहे.

त्यांच्यासोबत भाजप व महायुतीचे ज्येष्ठ नेतेदेखील असतील. प्रचारातील अखेरच्या तीन दिवसांतील सभा व रोड शो लक्षात घेता गडकरींच्या सभांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाचे कार्य व राज्य शासनाची अडीच वर्षांतील कामगिरी या आधारावर गडकरी त्यांच्या रोखठोक शैलीत मतदारांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती प्रदेश भाजपकडून देण्यात आली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपा