शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींना राहुल गांधींचे विचार पटतात : आशिष देशमुख यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 22:48 IST

भाजपाच्या खेम्यातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गडकरी कुणाच्या भीतीपोटी विविध वक्तव्ये करीत असल्याचा सवाल उपस्थित करत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांची प्रशंसा करणाऱ्या गडकरी यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेदेखील विचार पटत असल्याचा दावा त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान केला.

ठळक मुद्दे पत्रपरिषदेत अनेक प्रश्नही केले उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाच्या खेम्यातून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. गडकरी कुणाच्या भीतीपोटी विविध वक्तव्ये करीत असल्याचा सवाल उपस्थित करत माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांची प्रशंसा करणाऱ्या गडकरी यांना कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेदेखील विचार पटत असल्याचा दावा त्यांनी पत्रपरिषदेदरम्यान केला.नितीन गडकरी यांनी मागील काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांमध्ये काही छुपा संदेश आहे का व कुणाच्या भीतीने ते कासावीस झाले आहेत, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित केला. नागपुरात किती बेरोजगार तरुणांना रोजगार प्राप्त झाला, याची सविस्तर माहिती गडकरी यांनी जाहीर करावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.इंदिरा गांधी यांनी आपल्या पक्षातील निष्ठावान पुरुष नेत्यांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करून दाखवले होते. यासाठी त्यांनी कुठल्याही आरक्षणाचा लाभ घेतला होता का? त्या महिला सक्षमीकरणाच्या आदर्श होत्या, असे गौरवोद्गार गडकरी यांनी रविवारी काढले होते.

 

टॅग्स :Ashish Deshmukhआशीष देशमुखNitin Gadkariनितीन गडकरी