शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न

By admin | Updated: May 9, 2014 02:26 IST

नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीने राज्यालाच नव्हे तर देशाला आशेचे किरण दाखविले आहे. ज्या बेरोजगारीच्या संघर्षातून नक्षली घडतात

नागपूरसह पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड  आनंद डेकाटे■ नागपूर नक्षलग्रस्त व मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीने राज्यालाच नव्हे तर देशाला आशेचे किरण दाखविले आहे. ज्या बेरोजगारीच्या संघर्षातून नक्षली घडतात त्या बेरोजगारीला संपविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याने राबविलेल्या पॅटर्नची आता सर्वांनीच दखल घेतली आहे. बेरोजगारी निर्मूलनाचा गडचिरोली पॅटर्न आता होणार आहे. त्यासाठी राज्यातील पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली असून, यात नागपूरचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्हा उद्योगातही मागास आहे. परंतु या संकटातच समोर जाण्याचा मार्गही गवसला. गडचिरोलीचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या पुढाकाराने बेरोजगार तरुणांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची योजना आखण्यात आली. बेरोजगार युवकांची नोंदणी करणे, त्यांच्यातील कौशल्याचा शोध घेणे. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण देणे आणि नोकरीसाठी प्रयत्न करणे, अशी ही योजना होती.

नागपूरसह पाच जिल्ह्याची प्रायोगिक तत्त्वावर निवड

शासनातर्फे राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये बेरोजगार तरुणांसाठी 'स्किल डेव्हलपमेंट' कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून त्यात नागपूरचाही समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या धर्तीवर हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने विभाग तयारीत आहे. परंतु त्यासंबंधीचे दिशानिर्देश मात्र कार्यालयाला अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही.ज्ञा. मा. गोस्वामी सहायक संचालक