गडचिरोलीत शंभरावर ग्राम पंचायती गोदरीमुक्त होणार

By admin | Published: May 22, 2017 04:39 PM2017-05-22T16:39:39+5:302017-05-22T16:39:39+5:30

राज्यस्तरीय समिती मार्फत तपासणीअंती जिल्ह्यातील ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त होणार आहेत.

In Gadchiroli, hundreds of village panchayats will be free from Godriots | गडचिरोलीत शंभरावर ग्राम पंचायती गोदरीमुक्त होणार

गडचिरोलीत शंभरावर ग्राम पंचायती गोदरीमुक्त होणार

Next

आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात वैयक्तिक शौचालयाचे १०० टक्के काम करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण १४४ ग्रामपंचायतीचे प्रस्ताव गोदरीमुक्ती गाव म्हणून घोषित करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाकडे एप्रिल अखेर सादर केले आहे. राज्यस्तरीय समिती मार्फत तपासणीअंती जिल्ह्यातील ११० वर ग्रामपंचायती गोदरीमुक्त होणार आहेत.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेला देसाईगंज वगळता इतर ११ तालुक्यांसाठी एकूण ३४ हजार २४९ शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट शासनाने सन २०१६-१७ या वर्षासाठी दिले होते. यापैकी एप्रिल अखेरपर्यंत ११ तालुक्यात एकूण ३१ हजार २०२ शौचालयांचे काम पूर्ण झाले आहे.
राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्याला सन २०१६-१७ या वर्षात ११ तालुक्यातील १५८ ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये तब्बल ३४ हजार २४९ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट दिले. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत प्रशासनाने ३१ मार्च २०१७ पर्यंत उद्दिष्टानुसार मंजूर करण्यात आलेल्या सर्व शौचालयांचे काम १०० टक्के पूर्ण करावे, असा अल्टीमेटम शासनाने दिला होता.
३१ मार्च २०१७ पर्यंत १०० टक्के शौचालयाचे काम करण्यासाठी प्रशासनासह गावातील ग्रामसेवक व पदाधिकारीही सक्रीय झाले होते. त्यामुळे मार्च महिन्यात शौचालयाच्या बांधकामाने सर्वत्र वेग घेतला होता. मात्र शौचालयाचे १०० टक्के काम झाले नाही. त्यामुळे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी ३० एप्रिल २०१७ पर्यंत शौचालय बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत दिली. या तारखेपर्यंत भामरागड, चामोर्शी, धानोरा, गडचिरोली व कुरखेडा या पाच तालुक्यातील शौचालयाचे १०० टक्के काम पूर्ण केले. इतर सहा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी शौचालयाचे काम १०० टक्के पूर्ण केले. गडचिरोली पालिकेचीही गोदरीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

Web Title: In Gadchiroli, hundreds of village panchayats will be free from Godriots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.