शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ऑनलाईन सभेचा फज्जा! गोंधळामुळे कामकाज तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 22:27 IST

महापालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गुरुवारी बोलावण्यात आली होती. मात्र अस्पष्ट आवाज, अनेकांनी आपले मोबाईल म्यूट न केल्याने सुरू असलेला गोंगाट, त्यात काही नगरसेवक हॅलो- हॅलो करत होते. अशा गोंधळामुळे सभेचा फज्जा उडाला. तांत्रिक अडचणी लक्षात घेता, महापौर संदीप जोशी यांनी सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित केले.

ठळक मुद्दे प्रशिक्षण नसल्याने नगरसेवकांचे हॅलो-हॅलो!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा गुरुवारी बोलावण्यात आली होती. मात्र अस्पष्ट आवाज, अनेकांनी आपले मोबाईल म्यूट न केल्याने सुरू असलेला गोंगाट, त्यात काही नगरसेवक हॅलो- हॅलो करत होते. अशा गोंधळामुळे सभेचा फज्जा उडाला. तांत्रिक अडचणी लक्षात घेता, महापौर संदीप जोशी यांनी सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित केले.शोकप्रस्तावाने सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली. अभिनंदन प्रस्ताव संपताच स्थगन प्रस्तावाचे वाचन करण्यात आले. मेयो, मेडिकल शासकीय रुग्णालयात पुरेसे बेड उपलब्ध नाहीत. त्यात शहरातील मोजक्या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचाराला परवानगी आहे. अशा स्थितीत रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मनपा प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या आहेत, असा मुद्दा प्रस्तावाच्या माध्यमातून उपस्थित केला.काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी हा प्रस्ताव कुणी मांडला, असा प्रश्न उपस्थित केला. यावर भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी हा प्रस्ताव दिल्याचे सांगण्यात आले.महापौरांनी तिवारी यांचा प्रस्ताव स्वीकृत केला. मात्र दयाशंकर तिवारी हे ऑनलाईन नाहीत, असा आवाज आला. लगेच तिवारी हे आॅनलाईन आहेत, असे शब्द ऐकावयास आले. काँग्रेसचे कमलेश चौधरी मधेच बोलत असल्याने महापौरांनी सर्व नगरसेवकांना आपले मोबाईल म्यूट करण्यास सांगून दयाशंकर तिवारी यांना चर्चेला सुरुवात करण्यास सागितले.यावर आमदार प्रवीण दटके म्हणाले, सभागृहात लिंक नीट नाही. अशाने सभागृह व्यवस्थित चालविणे शक्य नाही. कोणालाही ऐकू येत नाही, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही. महत्त्वाच्या स्थगन प्रस्तावावर चर्चा होत आहे. आवाजच ऐकायला येत नसेल तर चर्चेला अर्थ नाही. त्यांनी दहा मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज स्थगित करण्याची मागणी केली. राजेंद्र सोनवणे, कमलेश चौधरी यांनीही तक्रार केली. विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही अशा पद्धतीने सभागृहात चालत नाही योग्य नाही, अशी भूमिका मांडली. स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके, माजी अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी सभा सुरेश भट सभागृहात घेण्याची सूचना केली.सुरू असलेला गोंधळ लक्षात घेता महापौरांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले. परंतु प्रफुल्ल गुडधे बोलत होते. त्यावर दटके यांनी सभा दहा मिनिटांसाठी तहकूब झाली, असे त्यांना सांगितले.सभागृहाचे पुन्हा लाईव्ह कामकाज सुरू होताच गोंधळाला सुरुवात झाली. अडचणी लक्षात घेता महापौरांनी नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीने हे सर्व सुरू आहे त्यावरून अत्याधुनिक यंत्रणा कामाची नाही. अशा पद्धतीने सभागृहात चालणार नाही. ते योग्यही होणार नाही. प्रशासनाने तांत्रिक अडचणी उद्यापर्यंत दूर कराव्यात असे निर्देश देत सभेचे कामकाज तहकूब करून शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्थगित सभा घेण्याचे जाहीर केले.भट सभागृहात सभा घेण्यासाठी आग्रहकोविड कालावधीत याआधीची सर्वसाधारण सभा सुरेश भट सभागृह घेण्यात आली होती. ही सभासुद्धा तेथेच घेण्यात यावी, असा आग्रह आजच्या लाईव्ह सभेत टेक्नोसेव्ही नसलेल्या अनेक नगरसेवकांनी केला. शुक्रवारी सभागृहाचे कामकाज सुरळीत होते की नाही याकडे लोकांचे लक्ष लागले आहेमर्यादित सदस्यांच्या उपस्थितीत सभागृह घ्यावे!कोविड काळात फिजिकल डिस्टन्स व नियमांचे पालन करून भट सभागृहात सर्वसाधारण सभा घेण्यात आली. अमरावती महापालिकेत २५ टक्के नगरसेवकांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. त्याच धर्तीवर नागपूर महापालिकेची सभा मर्यादित नगरसेवकांच्या उपस्थितीत घेण्यात यावी. अन्य नगरसेवकाना ऑनलाईन जोडण्यात यावे, अशी मागणी सत्तापक्ष नेते संदीप जाधव व विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी महापौरांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाonlineऑनलाइन