‘बाॅडी पॅकिंग किट’विनाच अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:08 AM2021-04-19T04:08:32+5:302021-04-19T04:08:32+5:30

लाेकमत न्यूज नेवटर्क उमरेड : शहरात रविवारी (दि. १८) तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशावेळी ‘बॉडी पॅकिंग किट’ची आजही ...

Funeral without ‘body packing kit’ | ‘बाॅडी पॅकिंग किट’विनाच अंत्यविधी

‘बाॅडी पॅकिंग किट’विनाच अंत्यविधी

Next

लाेकमत न्यूज नेवटर्क

उमरेड : शहरात रविवारी (दि. १८) तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. अशावेळी ‘बॉडी पॅकिंग किट’ची आजही व्यवस्था न झाल्याने या किटविनाच अंत्यविधी पार पडला. मृतांच्या कुटुंबीय व आप्तस्वकीयांनी या किटसाठी संबंधित यंत्रणेला तसेच काही लोकप्रतिनिधींना संपर्क केला असता, सर्वांनीच एकमेकांकडे बोट दाखवित हात वर करण्याचा प्रकार केला. अखेरीस धोका पत्करून कुटुंबीयांना काहींना सोबतीला घेत अंत्यविधी उरकावा लागला.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह हाताळताना अथवा अंत्यविधी पार पाडताना मृतदेहासाठी बॉडी पॅकिंग किट अत्यंत मोलाची मानली जाते. सोबतच ही प्रक्रिया पार पाडणाऱ्यांनाही किटची गरज असते. अशी कठीण वेळीच जर किट उपलब्ध नसेल, यात दोष कुणाचा, असा सवाल विचारला जात आहे.

काही दिवसांपूर्वीच उमरेड नगरपालिका सभागृहात व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांची बैठक पार पडली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. खानम यांनी आमच्याकडे किट उपलब्ध असल्याची बाब आमदार राजू पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया यांच्यासमक्ष सांगत शाबासकी मिळवून घेतली.

अधिकारीच लोकप्रतिनिधींना खोटी माहिती देत असतील तर मग अन्य लोकांकडून काय अपेक्षा करायच्या, अशा संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत असून, विविध गंभीर समस्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Web Title: Funeral without ‘body packing kit’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.