शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सजलेल्या मंडपातून अंत्ययात्रा निघाली : तरुण प्राध्यापिकेचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 22:00 IST

Young lady professor died in an accident नागपूरच्या डॉक्टर मुलाशी ती विवाहबंधनात अडकणार होती. १० जानेवारीला तिचा विवाह ठरला होता. कुटुंबासह आप्तस्वकीय सारेच लग्न सोहळ्याच्या तयारी होते. घरासमोर मंडपही सजला. अशातच क्रूर काळाने तिला हिरावून नेले. सजलेल्या लग्न मंडपातूनच तिची अंत्ययात्रा निघाली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील टिकेपार शिवारात  काळाने केली तिच्या स्वप्नांची राखरांगोळी

लोकमत  न्यूज  नेटवर्क 

उमरेड:  नागपूरच्या डॉक्टर मुलाशी ती विवाहबंधनात अडकणार होती. १० जानेवारीला तिचा विवाह ठरला होता. कुटुंबासह आप्तस्वकीय सारेच लग्न सोहळ्याच्या तयारी होते. घरासमोर मंडपही सजला. अशातच क्रूर काळाने तिला हिरावून नेले. सजलेल्या लग्न मंडपातूनच तिची अंत्ययात्रा निघाली. अनेकांना चटका लावणारा हा प्रसंग उमरेड परसोडी (जि. नागपूर) येथे गुरुवारी साऱ्यांना अक्षरश: रडवून गेला.

काळाने हिरावून नेलेल्या तरुण प्राध्यापिकेचे नाव डॉ. नीलिमा सुखदेव नंदेश्वर (३५, परसोडी, उमरेड) आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान समुद्रपूर (जि. वर्धा) नजीक असलेल्या पाईकमारी शिवारात हा अपघात झाला. नीलिमा यांची आई प्रभा नंदेश्वर या सुद्धा त्यांच्या सोबतीला होत्या. कारने झालेल्या या अपघातात प्रभा नंदेश्वर यांच्या डोळ्याला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. नीलिमा नंदेश्वर या आनंदवन वरोरा येथे आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कर्तव्यावर होत्या. कृषी अर्थशास्त्रात त्यांनी पीएच.डी सुद्धा केलेली आहे. त्यांचा विवाह नागपूर येथील डॉ. अश्विन टेंभेकर यांच्याशी ठरला होता. उमरेड (ठाणा) परिसरातील रिसोर्टवर त्याची छोटेखानी तयारी सुद्धा सुरू होती. विवाहापूर्वी आज काही महाविद्यालयीन कामकाज आटोपून घेण्यासाठी प्रा.नीलिमा आणि आई प्रभा दोघीही उमरेड येथून अल्टो कारने समुद्रपूरच्या दिशेने निघाल्या. नीलिमा स्वत: कार चालवित होत्या. अशातच समुद्रपूरनजीक असलेल्या पाईकमारी शिवारात कार अनियंत्रित झाली. रस्त्यानजीकच्या खड्ड्यात त्यांची कार कोसळली. कारने दोन पलट्या मारल्या. अपघात होताच नागरिक मदतीला धावले. पलटलेल्या कारमधून दोघींनाही बाहेर काढले. तत्पुर्वी नीलिमा यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर भिवापूर मार्गस्थित स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वप्नांची राखरांगोळीनीलिमा तीन दिवसानंतर सासरी जाणार होती. आयुष्याची सुखी स्वप्ने रंगवीत असतानाच अचानकपणे झालेल्या अपघातात तिची प्राणज्योत मालवली. लगीनगाठ बांधण्यापूर्वीच प्रेतयात्रा निघाली. प्राध्यापक नीलिमा हिच्या स्वप्नांची राखरांगोळी करणारा हा अपघात ठरला.

सारेच अबोल झालेनीलिमा यांचा भाऊ पुण्याला इंजिनिअर आहे. बहीण वसईला डॉक्टर तर लहान बहीण नागपूरला वास्तव्याला असून यांच्यासह संपूर्ण गोतावळ उमरेड येथे गोळा झाला होता. सकाळीच महाविद्यालयात जाऊन लवकर परत येणार असे सांगून गेलेल्या नीलिमाचे प्रेतच आल्याने सारेच अबोल झाले होते.

टॅग्स :AccidentअपघातProfessorप्राध्यापकDeathमृत्यू