शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शिवणगावातील प्रकल्पग्रस्तांना घरबांधणीसाठी अनुदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 20:49 IST

मिहान प्रकल्पांतर्गत शिवणगाव येथील घरे संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना घरबांधणीकरिता देण्यात येणारे अनुदान हे पंतप्रधान योजनेच्या धर्तीवर अडीच लाख रुपये देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापूर्वी घरबांधणीकरिता प्रकल्पग्रस्तांना एक लाख रुपयाचे अनुदान देण्यात येत होते.

ठळक मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना : पंतप्रधान आवास योजनेत २.५० लाख

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मिहान प्रकल्पांतर्गत शिवणगाव येथील घरे संपादित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना घरबांधणीकरिता देण्यात येणारे अनुदान हे पंतप्रधान योजनेच्या धर्तीवर अडीच लाख रुपये देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यापूर्वी घरबांधणीकरिता प्रकल्पग्रस्तांना एक लाख रुपयाचे अनुदान देण्यात येत होते.रामगिरी येथे मिहान प्रकल्पांतर्गत भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत वरिष्ठ अधिकारी व प्रकल्पग्रस्तांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, मिहानचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मिहानचे तांत्रिक सल्लागार एस. व्ही. चहांदे, मुख्य अभियंता एस. के. चॅटर्जी, मिहान सल्लागार समितीचे सदस्य विजय राऊत, नगरसेवक किशोर वानखेडे व प्रकाश भोयर यांच्यासह शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात शासनाच्या निर्देशानुसार येत्या आठ दिवसांत पालकमंत्री व प्रकल्पग्रस्तांची संयुक्त बैठक घेऊन प्राधान्याने सोडविण्याची सूचना करताना शिवणगाव (गावठाण) येथील घरे संपादित झालेल्या शेतकऱ्यांना भूखंड तसेच स्वतंत्रपणे राहत असलेल्या कुटुंबांचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा. शिवणगाव येथे विक्तूबाबानगर अतिक्रमित जागेवरील कुटुंबांना भूखंड मंजूर करताना शेती संपादित झाली असल्यास त्यानुसार मागणीचा विचार करण्यात यावा, अशा सूचनाही करण्यात आल्या.मिहान प्रकल्पांतर्गत टॅक्सी-वेच्या बांधकामाकरिता आवश्यक असलेल्या जागेवरील घरांचे भूसंपादन करताना त्यांचे पुनर्वसन जयताळा अथवा भामटी येथील यापूर्वी संपादित करण्यात आलेल्या जागेवर करण्यात यावे. टॅक्सी-वेसाठी अंदाजे ७० घरांचे भूसंपादन आवश्यक आहे. भूसंपादनाची प्रक्रिया तसेच पुनर्वसनाची प्रक्रिया प्राधान्याने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.मिहान प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात तसेच घरकुलाचे बांधकाम एक लाख रुपयाच्या अनुदानात होत नसल्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उपलब्ध करून देत असलेले अनुदान बांधकामासाठी द्यावे, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी यावेळी केली. प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांसंदर्भातही आढावा घेण्यात आला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfundsनिधी