शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फरार आरोपीला छत्तीसगडमध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:12 IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अन्सारी (वय २४, रा. चैतन्येश्वरनगर, खरबी, नंदनवन) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. पोलिसांनी त्याला छत्तीसगडमध्ये जाऊन अटक केली.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीवर बलात्कार : आरोपी नंदनवन पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्यानंतर फरार झालेल्या आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अन्सारी (वय २४, रा. चैतन्येश्वरनगर, खरबी, नंदनवन) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. पोलिसांनी त्याला छत्तीसगडमध्ये जाऊन अटक केली.पायी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला १३ मार्च रोजी आरोपी अजहरने घरी सोडून देतो, असे म्हणून आपल्या मोटरसायकलवर बसवले. तिला स्वत:च्या घरी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता आरोपीने तिला मारहाण केली. ही घटना दुसऱ्या कुणाला सांगितल्यास तुझी बदनामी करेन, अशी धमकीही दिली. पीडित मुलीने त्याच्या तावडीतून सुटल्यानंतर नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी अजहरविरुद्ध बलात्कार तसेच पोक्सो कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच आरोपी नागपुरातून फरार झाला. तो नांदेड, मुंबई, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये लपून वारंवार आपले लोकेशन बदलवत होता. त्यामुळे त्याला अटक करण्यात पोलिसांना अडचण होत होती. दोन दिवसांपूर्वी तो छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये दडून असल्याची माहिती कळताच पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी त्याच्या अटकेसाठी नंदनवन ठाण्याचे एक पोलीस पथक तेथे पाठविले. या पथकाने बिलासपुरात जाऊन आरोपी अजहरच्या मुसक्या बांधल्या. त्याला शुक्रवारी नागपुरात आणण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याला अटक केली.परिमंडळ ४ चे उपायुक्त नीलेश भरणे, सक्करदरा विभागाचे सहायक आयुक्त कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली नंदनवनचे ठाणेदार माणिल नलावडे, द्वितीय निरीक्षक साळुंके, सहायक निरीक्षक धाडगे, उपनिरीक्षक एस. एस. चव्हाण, नायक अमोल जसूद, दीपक तऱ्हेकर, दीपक बेलसरे, अभिषेक शनिवारे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटक