शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पकोडे तळून भाजप विरोधात नारेबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 23:54 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोड्याचा व्यवसाय हाही रोजगारच आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही पकोड्यासंदर्भात वक्तव्य करून उच्चशिक्षित बेरोजगार युवकांची थट्टा केली आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्या नेतृत्वात व शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रा. प्रज्ञा बडवाईक यांच्या पुढाकाराने मंगळवारी महाल येथील महापालिके च्या टाऊ न हॉल सभागृहाबाहेर प्रधानमंत्री पकोडा आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमहिला काँग्रेसचे आंदोलन : मनपा सभागृहातही सहारे यांनी मुद्दा उपस्थित केला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पकोड्याचा व्यवसाय हाही रोजगारच आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही पकोड्यासंदर्भात वक्तव्य करून उच्चशिक्षित बेरोजगार युवकांची थट्टा केली आहे. याचा निषेध म्हणून महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अ‍ॅड. चारुलता टोकस यांच्या नेतृत्वात व शहर महिला काँग्रेस अध्यक्ष प्रा. प्रज्ञा बडवाईक यांच्या पुढाकाराने मंगळवारी महाल येथील महापालिके च्या टाऊ न हॉल सभागृहाबाहेर प्रधानमंत्री पकोडा आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.सत्तेवर येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर आल्यानंतर भाजपाला आपल्या आश्वासनाचा विसर पडला. ही बेरोजगारांची फसवणूक असल्याचा आरोप चारुलता टोकस यांनी यावेळी केला. यावेळी पकोडे तळून विकण्यात आले. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. नागरिकांनी पकोडे खरेदी करून आंदोलनाला प्रतिसाद दिला.आंदोलनात प्रदेश पदाधिकारी कल्पना फु लबांधे, बेबी गौरीकर, शिल्पा जवादे, कविता घुबडे, शालिनी सरोदे, रिचा जैन, समशाद बेगम, पूजा देशमुख, प्रमिला धामणे, रजनी हजारे, भारती कामडी, अर्चना कापसे, नंदा देशमुख, सुनिता जिचकार, संगीता उपरीकर, रजनी बरडे, डॉ. चित्रा तूर, उर्मिला विश्वकर्मा, प्रगती पाटील यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.सभागृहातही पकोड्याचा मुद्दापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महापालिकेने नागपूर शहरातील बेरोजगारांना पकोडे विकण्यासाठी बाजारात व फूटपाथवर जागा उपलब्ध करण्याबाबतचा प्रश्न काँग्रेसचे संदीप सहारे यांनी सर्वसाधारण सभेच्या कामकाजात समाविष्ट करण्यासाठी दिला होता. मात्र हा प्रश्न अजेंड्यावर घेण्यात आला नव्हता. यासंदर्भात सहारे यांनी प्रशासनाला विचारणा केली. सभेच्या कामकाजात अधिक प्रश्न आल्याने समावेश करता आला नाही, अशी माहिती निगम सचिव हरीश दुबे यांनी दिली. यावेळी सहारे यांनी बेरोजगार युवकांना पकोडा व्यवसायासाठी जागा देण्याची मागणी केली.ओसीडब्ल्यू विरोधात आंदोलनशहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यू कंपनीने तब्बल १८ कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते़ यातील चार कर्मचाऱ्यांना परत घेतले. उर्वरित कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट आले आहे. या कर्मचाऱ्यांनी नुकतेच संविधान चौकात साखळी उपोषण केले होते़ मंगळवारी त्यांनी सभागृहाबाहेर आंदोलन करीत सत्ताधारी भाजपाच्या विरोधात घोषणाबाजी केली़ यात चंद्रशेखर भुते, उमेश शर्मा, मोहम्मद हारुन शेख, लेहन दास, पांडुरंग गोंडाणे, इदबार खटुजी मेश्राम, सुनील बिरोले, शंकर पवार, उपास सरोदे, उमेश उके, सुरेश पाटील, प्रमोद भोयर, राहुल भादे, दशरथ सरोदे, नीतेश पाटील, ज्ञानेश्वर थोरात, नितीन अखंड, शैलेश पंचवटे यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन