शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सुपारी गोदामावरील धाडीमुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:54 IST

गुन्हेगारांच्या मदतीने सुपारीच्या गोदामांवर धाड मारल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. सुपारी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे या घटनेची तक्रार केली आहे.

ठळक मुद्देकृष्णा खोपडे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हेगारांच्या मदतीने सुपारीच्या गोदामांवर धाड मारल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. सुपारी व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्याकडे या घटनेची तक्रार केली आहे.पोलिसांनी मंगळवारी रात्री यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरातील एका सुपारी गोदामावर धाड टाकली. येथे मोठ्या प्रमाणावर सुपारी ठेवली होती. पोलीस दलासोबत उत्तर नागपुरातील एक चर्चित गुन्हेगारही होता. त्याच्या सांगण्यावरूनच पोलिसांनी गोदामावर धाड टाकली होती. पोलिसांनी एफडीए अधिकाऱ्यांना या कारवाईची सूचना देऊन त्यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सुपारी व्यापारीही गोदामावर आले. ते पोलीस कारवाईच्या विरुद्ध नारेबाजी करू लागले. व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की, पोलिसांनी गुन्हेगाराच्या इशाऱ्यावर कारवाई केली आहे. या गुन्हेगाराविरुद्ध खंडणी वसुलीचे गुन्हे दाखल आहेत. तो व्यापाऱ्यांना कारवाईची भीती दाखवून खंडणी मागतो. खंडणी न दिल्यास पोलीस व एफडीएला माहिती देऊन कारवाईची धमकी देतो. तो गेल्या दोन दिवसांपासून गोदाम मालकाला खंडणीसाठी धमकावीत होता. त्याच्या धमकीला भीक न घातल्याने तो पोलिसांना सोबत घेऊन आला.व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. दरम्यान एफडीएची चमू गोदामाला सील लावून निघून गेली.या कारवाईच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांची भेट घेतली. व्यापाऱ्यांनी पोलीस आयुक्तांना गुन्हेगार व इतर स्वयंघोषित नेत्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी पोलिसांकडून भविष्यात व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले. यानंतर व्यापाऱ्यांनी एफडीए अधीक्षक शशिकांत केकरे यांचीही भेट घेतली. त्यांनीही संशयास्पद तक्रारीच्या आधारावर कारवाई न करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :agitationआंदोलनbusinessव्यवसाय