शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीपूर्ण कार्य हाच चांगली मैत्री व बंधुत्वाचा पाया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 00:38 IST

मैत्रीपूर्ण कार्य हाच चांगली मैत्री आणि बंधुत्वाचा पाया आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हेच विचार मांडले आहेत, असे प्रतिपादन इंग्लंडमधील बौद्ध विचारवंत व साहित्यिक धम्मचारी सुभूती यांनी दीक्षाभूमीवर केले.

ठळक मुद्देबुद्ध महोत्सव : धम्मचारी सुभूती यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मैत्रीपूर्ण कार्य हाच चांगली मैत्री आणि बंधुत्वाचा पाया आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हेच विचार मांडले आहेत, असे प्रतिपादन इंग्लंडमधील बौद्ध विचारवंत व साहित्यिक धम्मचारी सुभूती यांनी दीक्षाभूमीवर केले.बुद्ध महोत्सवांतर्गत शुक्रवारी रत्नावली व्याख्यानमालेंतर्गत प्रतित्य समुत्पाद (कार्यकारण भाव) याविषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. धम्मचारी सुभूती म्हणाले, कर्माचे नियम हे नैतिक व्यवस्थेला नियंत्रित करतात. स्वत:बद्दल केवळ मनुष्यच विचार करू शकतो. त्यामुळे मनुष्य अनेक निर्णय घेण्यास सक्षम असतो, अशा प्रकारे त्यांनी कार्यकारण भाव समजावून सांगितला. धम्मचारी सुभूती यांच्या इंग्रजीतील व्याख्यानाचा अनुवाद धम्मचारिणी मोक्षसारा यांनी केले.यावेळी सेव्हन आटर््स अकादमीच्या जयश्री शाक्य आणि जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या विद्यार्थिनींनी समस्य संबुद्ध अभिवादन नृत्य सादर केले. यानंतर अरविंद उपाध्याय आणि त्यांच्या चमूने भारतीय संगीत व पाश्चिमात्य संगीताचे सादरीकरण केले. धम्मचारी नागकेतू यांनी संचालन केले. अश्विन कापसे यांनी आभार मानले.

युवकांनो स्वयंरोजगाराकडे वळाबुद्ध महोत्सवात शुक्रवारी दुपारी भीम इंटरप्रीनरशीप डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे ‘मिशन इंटरप्रीनरशीप’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. अनिल गायकवाड यांनी ‘उद्योग का करायला हवा’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले आता देशभरात शासकीय नोकºया कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे युवकांनी आता उद्योगाकडे वळावे. पिरामिड ग्रुपचे निदेशक संजय गोस्वामी, रिटा पोटपोसे, अश्विन कापसे यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विनोद तावडे यांनी भीम इंटरप्रीनरशीप डेव्हलपमेंट कौन्सिलबाबत सादरीकरण केले. केंद्र सरकारच्या मध्यम उद्योगाचे माजी सहायक संचालक चक्रधर दोडके, सीए विक्रम बोरकर, हेमंत वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आज चि कुंग चिनी व्यायाम व सांस्कृतिक कार्यक्रम२४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता चि कुंग ही चिनी व्यायाम कला सर्वांसाठी खुली राहील. दुपारी २.३० वाजता केवळ डॉक्टरांसाठी राहील. मास्टर सिफू स्टीव्हन हे ही कला शिकवतील. सायंकाळी ६ वाजता धम्मचारी सुभूती यांचे व्याख्यान होईल आणि त्यानंतर नेदरलँडचे नामग्याल ल्हामो हे संगीमय कार्यक्रम सादर करतील. 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीcultureसांस्कृतिक