शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहरातील वाहतूक सुकर करण्यासाठी फ्रान्सचे ‘बूस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 21:47 IST

शहरातील सार्वजनिक वाहतूक सुकर करण्यासाठी लोकांना मदत करणे शक्य आहे. यातून शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. यासाठी शहरी गतिशीलता (अर्बन मोबिलिटी) प्रकल्पांतर्गत एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) ने देशातील तीन शहरांची निवड केली आहे. यात नागपूरसह कोची व अहमदाबादचा समावेश आहे. या प्रकल्पाला सर्वप्रथम नागपुरात सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला याचाच एक भाग म्हणून मदत केली जात आहे. एएफडी महापालिकेला तांत्रिक सहकार्य करणार आहे.

ठळक मुद्देएएफडीकडून तांत्रिक व आर्थिक सहकार्य : देशभरातील तीन शहरात नागपूरचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील सार्वजनिक वाहतूक सुकर करण्यासाठी लोकांना मदत करणे शक्य आहे. यातून शहरातील रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होणार आहे. यासाठी शहरी गतिशीलता (अर्बन मोबिलिटी) प्रकल्पांतर्गत एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) ने देशातील तीन शहरांची निवड केली आहे. यात नागपूरसह कोची व अहमदाबादचा समावेश आहे. या प्रकल्पाला सर्वप्रथम नागपुरात सुरुवात करण्यात आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला याचाच एक भाग म्हणून मदत केली जात आहे. एएफडी महापालिकेला तांत्रिक सहकार्य करणार आहे. यातून शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम व सुकर करण्याला मदत करणार असल्याची माहिती एएफडीचे लीड ट्रान्सपोर्ट स्पेशॅलिस्ट अर्नाड डॉफिन यांनी मंगळवारी दिली. ‘शाश्वत शहरी गतिशीलतेला प्रोत्साहन’ यावर आयोजित दोन दिवशीय कार्यशाळेच्या उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.डॉफिन म्हणाले, २०१४ सालापासून भारतातील विविध शहरात एएफडी काम करीत आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला कर्ज उपलब्ध करण्यासोबतच तांत्रिक मुद्यावर सहकार्य करीत आहे. मेट्रो रेल्वेशी अधिकाधिक प्रवासी जोडण्यासाठी फीडर बससेवा सुरू करण्याची योजना आहे. सोबतच रोजगार उपलब्ध करण्यासाठी मदत करणार आहे. नागपूर महापालिकेसोबत मोबिलिटी प्रकल्पांतर्गत तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे. याचा आराखडा एएफडी तयार करणार आहे.वाहतूक व्यवस्था डिजिटल केली जाणार आहे. यासाठी अ‍ॅप तयार करण्यात येतील. ई-बाईक, ई-सायकल, रिचार्ज स्टेशन अशा प्रकल्पासाठी एएफडी मदत करणार आहे. अशा प्रकल्पाला तांत्रिक सहकार्य करण्याला एएफडीची प्राथमिकता असल्याचे डॉफिन यांनी सांगितले.इंडिगे्रटेड मल्टीमॉडल सिस्टमच्या माध्यमातून काम क रण्यात येईल. परंतु प्रत्येक शहराची गरज व परिस्थिती वेगवेगळी असते. याचा विचार करून वाहतूक यंत्रणा सक्षम झाली पाहिजे.एएफडी(भारत)च्या सहसंचालक क्लेमेन्स डी ला ब्लॅच म्हणाल्या, एएफडी मागील दहा वर्षापासून भारतात अर्बन मोबिलिटीवर काम करीत आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले आहे. नागपूर शहरातही विस्तृत परियोजनेवर काम सुरू आहे. तंत्रज्ञानातून अनेक अडचणी सहज सोडविता येतात. यातील वाहतूक यंत्रणा ही एक आहे.नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे म्हणाले, फ्रान्स देशातील तीन शहरातील वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी मदत करीत आहे. यात नागपूरचा समावेश आहे. करारानंतर प्रथमच अर्बन मोबिलिटीवर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यातील चर्चेनंतर विस्तृत मोबिलिटी आराखडा तयार केला जाणार आहे. कार्यशाळेत देश-विदेशातील ६० प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे. यावेळी भारताच्या युरोपियन युनियन प्रतिनिधी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक स्मिता सिंग, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट भारताच्या सहसंचालक क्लेमेन्स विडाल डी ला ब्लॅच, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प अधिकारी रजनीश अहुजा आदी उपस्थित होते.तीन मिलियन युरोची मदतएएफडी देशातील निवड करण्यात आलेल्या तीन शहरांसाठी तीन मिलियन युरो निधी देणार आहे. यात नागपूर शहराला किती रक्कम मिळणार असा प्रश्न केला असता, अर्नाड स्पष्ट बोलू शकले नाही. मात्र ज्या कामासाठी गरज भासेल त्यासाठी हा निधी उपलब्ध केला जाईल. शहराला एक मिलियन युरो देण्याची कोणत्याही स्वरूपाची अट घातलेली नाही. विशेष म्हणजे एक मिलियन युरो म्हणजेच ही रक्कम ८.२१ कोटींच्या आसपास होते.दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटननागपूर महानगरपालिका, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट (एएफडी) व युरोपियन युनियन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपुरातील ‘शाश्वत शहरी गतिशीलतेला प्रोत्साहन’(प्रमोटिंग सस्टेनेबल अर्बन मोबिलिटी इन नागपूर)या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे मंगळवारी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे,आयुक्त वीरेंद्र सिंह, डॉ. रामनाथ सोनवणे, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे लिड ट्रान्सपोर्ट स्पेशालिस्ट अर्नाड डॉफीन, भारताच्या युरोपियन युनियन प्रतिनिधी वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक स्मिता सिंग, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे समन्वयक मॅथ्यू अर्नाड, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंट भारताच्या सहसंचालक क्लेमेन्स विडाल डी ला ब्लॅच, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे प्रकल्प अधिकारी रजनीश अहुजा, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटचे ग्रँट आॅफिसर जतीन अरोरा, एजेन्स फ्रान्स डी डेव्हलपमेंटच्या संपर्क अधिकारी राधिका टाकरू यांच्यासह नागपूर सुधार प्रन्यास, महामेट्रो, नीरी, शहरातील विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाFranceफ्रान्स