शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

संविधानामुळेच प्रसार माध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य : फिरदोस मिर्झा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 00:55 IST

नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देजनसंवाद विभागात संविधान दिवस साजरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानामुळेच नागरिकांना मूलभूत अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्राप्त झाले आहेत. नागरिकांचा आवाज होता यावे व त्यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रसार माध्यमांची आहे. प्रसार माध्यमांनादेखील संविधानामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत वरिष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्झा यांनी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात संविधान दिवसानिमित्त ‘माध्यम स्वातंत्र्य व भारताचे संविधान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.जनसंवाद विभागाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमादरम्यान राज्यघटनेच्या प्रास्ताविका फलकाचेदेखील अनावरण करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख डॉ. मोईज हक, डॉ. धर्मेश धवनकर, स्निग्धा खटावकर प्रामुख्याने उपस्थित होते. शासन व्यवस्थेला संविधानात्मक जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे हे प्रसार माध्यमांचे कर्तव्य आहे. माध्यमांच्या वृत्तांच्या संदर्भांमुळे काही वर्षांपूर्वी वंचित आदिवासी घटकातील ३० हजार नागरिकांना बीपीएल कार्ड मिळाले होते. ज्या देशातील प्रसारमाध्यमे जागृत असतात तेथील संविधानासोबत कुठलीही छेडछाड होऊ शकत नाही. मात्र, ज्या देशातील प्रसार माध्यमांनी शरणागती पत्करली, तेथील संविधान बदलण्याचे प्रयत्न झाले, असे अ‍ॅड.मिर्झा यांनी सांगितले. डॉ. मोईज हक यांनी प्रास्ताविक केले. सर्व जाती, धर्म, पंथाच्या नागरिकांना एका सूत्रात बांधण्याचे काम देशाचे संविधान करते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मेघा रोकडेने कार्यक्रमाचे संचालन केले. मनोहर शेंद्रे यांनी अतिथींचे स्वागत केले. तुषार धारकरने आभार मानले. दिशा करेशिया, ऐश्वर्या मेश्राम, अमेय ताकसांडे, विनय निमगडे, वैशिष्ट मांडवगडे, अमर अणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

टॅग्स :Constitution Dayसंविधान दिनMediaमाध्यमे