शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटींचा गंडा : बिल्डर कोंडावार बंधूंविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 21:36 IST

कंपनीच्या संचालकांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीच्या नावाने तीन कोटींचे कर्ज उचलणाऱ्या आणि नंतर ही रक्कम स्वत:च हडप करणाऱ्या बिल्डर कोंडावर बंधूंविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देकंपनीच्या संचालकांची फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कंपनीच्या संचालकांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीच्या नावाने तीन कोटींचे कर्ज उचलणाऱ्या आणि नंतर ही रक्कम स्वत:च हडप करणाऱ्या बिल्डर कोंडावर बंधूंविरुद्ध अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गोपाल लक्ष्मणराव कोंडावार (वय ५२) तसेच संजय लक्ष्मणराव कोंडावार (वय ४८), अशी आरोपींची नावे आहेत.कोंडावार बंधू रामदासपेठेत राहतात. त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने युनिक अ‍ॅग्रो प्रोसेसर इंडिया लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली होती. अमरावती मार्गावरील म्हाडा कॉम्प्लेक्समध्ये कंपनीचे कार्यालय होते. मे २०१२ मध्ये कोंडावार बंधूंनी कंपनीच्या संचालक तसेच पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून बनावट कागदपत्रे तयार केली. २ मे २०१२ ला कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची कागदोपत्री सभा (बैठक) दाखविली आणि त्या बैठकीचा एक बनावट ठराव तयार केला. या ठरावावर कंपनीच्या माजी चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर तसेच दोन संचालकांच्या बनावट सह्या केल्या. या बनावट ठरावाची कागदपत्रे पुसद अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या गांधीबाग शाखेतून तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले. याच बँकेत स्वत:चे खाते उघडून कर्जाचे तीन कोटी रुपये आपल्या बँक खात्यात वळते केले. कोंडावार बंधूंची जगदंबा रिअल इस्टेट कंपनी लि. आहे. कोंडावार बंधूंनी कर्जाची संपूर्ण रक्कम टप्प्याटप्प्याने जगदंबा रिअल इस्टेट कंपनीत वळती करून घेतली.सात वर्षांनंतर बनवाबनवी उघडसात वर्षांपूर्वी केलेल्या कोंडावार बंधूंच्या या बनवाबनवीची कुणकुण लागल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी त्यांना जाब विचारणे सुरू केले. कोंडावार बंधू चूक मान्य करण्याऐवजी निर्ढावलेपणा दाखवत असल्याने, कंपनीच्या संचालकांसोबत त्यांचा वाद वाढत गेला. कोंडावार बंधूंनी कर्ज कंपनीच्या नावे घेतले आणि ते आपल्या स्वत:च्या खात्यात (रिअल इस्टेट) खात्यात वळते केल्यामुळे, कंपनीच्या संचालकांचा रोष वाढला. खुशाल महादेवराव गेडाम (वय ८५) यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर कोंडावार बंधूंविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी