शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्काराच्या नावाखाली फसवणुकीचे रॅकेट; नागपुरातून तरुणीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 08:30 IST

‘लोकमत’ आणि नागपूर महापालिकेच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्याचे फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील महिला सदस्याला सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली.

नागपूर :

‘लोकमत’ आणि नागपूर महापालिकेच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्याचे फसवणुकीचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील महिला सदस्याला सीताबर्डी पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली. हिमांशी राजकुमार कोठेकर (शांतीनगर) असे अटक करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद बेलसरे याचा पोलिस शोध घेत आहेत.

सोशल मीडियावर दोन पोस्टर टाकून या टोळीने मानकापूर इनडोअर स्टेडियममध्ये मे महिन्यात लोकमत आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचा दावा केला होता. या सोहळ्याला अभिनेत्री रश्मिका मंदाना, कियारा अडवाणी उपस्थित राहणार असल्याचे सांगत शहरातील काही ब्युटिशियन्सना पुरस्कार देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. 

असा झाला प्रकार उघडकीसब्युटिशियन कीर्ती तिवारी यांनी ‘लोकमत’शी संपर्क साधला असता संपूर्ण प्रकरण समोर आले. बुधवारी दुपारी कीर्ती तिवारीचा डमी भाऊ हिमांशी कोठेकरला भेटायला पाठविण्यात आला. त्यावेळी टोळीने पुन्हा १५ हजार रुपयांची मागणी केली. आरोपींनी सांगितल्यानुसार हिमांशी कोठेकर ही डमी भावाला सीताबर्डीच्या मॉलसमोर भेटली. तेव्हा साध्या वेशातील पोलिसांनी हिमांशीला तेथेच पकडले. यावेळी हिमांशी या रकमेची पावती देणार असल्याचा दावा करत राहिली. हिमांशीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यात महाल रहिवासी गोविंद बेलसरे हा मुख्य आरोपी असल्याचे हिमांशीने पोलिसांना सांगितले. त्याच्या सांगण्यावरून ती ब्युटिशियन्सकडून पैसे घेत होती. पोस्टरवर लोकमत आणि मनपा यांचा लोगो असल्याने सर्वांनीच त्यावर विश्वास ठेवला होता. ती जमा केलेले पैसे गोविंदच्या खात्यातच जमा करणार होती.

वाचकांसाठी विनम्र सूचनामे महिन्यात संबंधित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, अशी पोस्ट ‘लोकमत’च्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटीजचे नावही घेण्यात आले आहे. यादरम्यान पुरस्कार देण्याच्या नावाखाली काही लोकांकडून पैशांची मागणी होत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘लोकमत’ने असा कोणताही कार्यक्रम आयोजित केलेला नाही. तसेच कोणत्याही बक्षिसासाठी पैशांची मागणी केली जात नाही. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी चौकशी करावी, अशी सर्वांना विनंती आहे. या कार्यक्रमाच्या नावाखाली कुणाचीही फसवणूक झाली, तर त्याला ‘लोकमत’ माध्यम समूह जबाबदार राहणार नाही.