शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एमबीबीएसच्या अ‍ॅडमिशनची थाप; ९ लाख १५ हजारांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 11:20 IST

सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला अ‍ॅडमिशन करून देण्याची थाप मारून एका टोळीने नागपुरातील जिमी प्रफुल्ल रांदेरिया (वय ४३) यांना ९ लाख १५ हजारांचा गंडा घातला.

ठळक मुद्देसायबर गुन्हेगारांनी ९.१५ लाख हडपले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला अ‍ॅडमिशन करून देण्याची थाप मारून एका टोळीने नागपुरातील जलारामनगरात राहणारे जिमी प्रफुल्ल रांदेरिया (वय ४३) यांना ९ लाख १५ हजारांचा गंडा घातला.मुलाला डॉक्टर बनविण्याचे जिमी यांचे स्वप्न आहे. त्यासाठी ते अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. ०८३७१८७९४५३, ७४०७३५६९३८ क्रमांकाच्या मोबाईलधारकांनी त्यांना काही दिवसांपूर्वी संपर्क केला. एमबीबीएसच्या प्रवेशासाठी लागणारी पात्रता आणि अन्य बाबींवर चर्चा केल्यानंतर जिमी यांच्याशी आरोपींनी सलगी साधली. त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर आरोपींनी जिमी यांच्या मुलाची सिक्कीम मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला अ‍ॅडमिशन करून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर ३१ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत आरोपींनी जिमी यांना बँकेच्या गंगटोक शाखेतील ०१५४८०२०००००१२ या खात्यात रक्कम जमा करायला भाग पाडले. त्यानुसार जिमी यांनी एचडीएफसी बँकेतून कोटक महिंद्रा तसेच येस बँकेत ९ लाख १५ हजार रुपये जमा केले. रक्कम जमा केल्यानंतर आरोपींनी सांगितल्याप्रमाणे वर्तन केले नाही. त्यामुळे जिमी यांना संशय आला. त्यांनी संबंधित महाविद्यालयाच्या प्रशासनाकडे संपर्क साधला असता, त्यांना त्या ठगबाजांनी फसविल्याचे लक्षात आले. त्यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी