शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

हल्दीरामच्या नावाचा गैरवापर उघड : अनेकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:05 IST

फूड मार्केटमधील मोठे नाव असलेल्या हल्दीराम फूड प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावाचा गैरवापर करीत एका आरोपीने ग्राहकांची फसवणूक केली. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर कळमना पोलिसांनी ९९०३५६ ४५८८ क्रमांकाच्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देकंपनीतर्फे तक्रार, कळमन्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फूड मार्केटमधील मोठे नाव असलेल्या हल्दीराम फूड प्रा. लिमिटेड या कंपनीच्या नावाचा गैरवापर करीत एका आरोपीने ग्राहकांची फसवणूक केली. हा गैरप्रकार उघड झाल्यानंतर कळमना पोलिसांनी ९९०३५६ ४५८८ क्रमांकाच्या मोबाईलधारकावर गुन्हा दाखल केला आहे.कळमना पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी ९९०३५६ ४५८८ क्रमांकाच्या मोबाईल धारकाने ९ एप्रिल ते १२ एप्रिल २०१९ दरम्यान विविध ग्राहकांकडून वेगवेगळे ऑर्डर घेतले. त्यांना मालाची रक्कम बँक ऑफ इंडियाच्या खाते क्रमांक ३८२६२० ९१७३७ मध्ये जमा करण्यास सांगितले. हा खाते क्रमांक निखिल कुमार मोहनलाल (रा. गुरुद्वारा रोड, दानापूर, पटना) यांच्या नावाचा आहे. आरोपीने त्यांनाही अंधारात ठेवून बँकेच्या आयएफसी कोड, एसीबीआय किंग्स वे नागपूरचे बनावटी करून ३१, ७०० रुपये हडपले. दरम्यान, रक्कम जमा केल्यानंतरही मालाचा पुरवठा न झाल्यामुळे संबंधित व्यक्तीने भंडारा मार्गावरील पारडीतील हल्दीरामच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर ही बनवाबनवी उघड झाली. कंपनीतर्फे कळमना पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी चौकशी सुरू करताच आरोपीने हल्दीराम फूड अ‍ॅन्ड इंटरनॅशनल प्रा. लि. ऐवजी हल्दीराम फूड स्रॅक्स प्रा. लि. नोएडा अशा नावाने कंपनीचा बनावट लोगोही तयार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. आरोपीने केवळ हल्दीराम कंपनीचीच नव्हे तर कंपनीच्या नावाने अनेकांची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी