शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या नावावर ८१ वर्षीय वृद्धाला फसविले; एटीएमची अदलाबदल करून ४० हजार लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 18:15 IST

त्या व्यक्तीने ‘क्या हुआ अंकल’ असे विचारत संबंधित इसमाने सिंह यांचे एटीएम कार्ड घेतले व ते मशीनमध्ये टाकण्याचा अभिनय केला. त्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलविले व तो निघून गेला.

नागपूर : एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदली करत ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. गिट्टीखदान पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला.

राजेंद्र रामचंद्र सिंह (८१, फ्रेंड्स कॉलनी) हे आपल्या पत्नीचे एटीएम कार्ड घेऊन फ्रेंड्स कॉलनी चौकातील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएममधील दुसऱ्या मशीनवर आणखी एक व्यक्ती उभा होता. सिंह यांनी मशीनमध्ये कार्ड टाकल्यावरदेखील पैसे येत नव्हते. त्यामुळे ते संभ्रमात पडले. त्यांनी आणखी दोनदा प्रयत्न केले. मात्र पैसे निघाले नाही.

दरम्यान, त्या व्यक्तीने ‘क्या हुआ अंकल’ असे विचारत संबंधित इसमाने सिंह यांचे एटीएम कार्ड घेतले व ते मशीनमध्ये टाकण्याचा अभिनय केला. त्याने हातचलाखीने एटीएम कार्ड बदलविले व तो निघून गेला. सिंह यांनी त्या इसमाने हाती दिलेले एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकल्यावर ‘इनव्हॅलिड’चा मॅसेज लिहून आला. त्यामुळे ते परत निघून गेले.

दुसऱ्या दिवशी ते परत पैसे काढण्यासाठी गेले असता परत ‘इनव्हॅलिड’चा मॅसेज स्क्रीनवर झळकला. त्यांनी कार्ड निरखून पाहिले असता त्यावर निहाल मालवी असे नाव होते. सिंह यांना शंका आली व त्यांनी पत्नीच्या मोबाईलमध्ये एसएमएस तपासले असता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बॅंक खात्यातून चार वेळा ९ हजार ५०० व एकदा दोन हजार रुपये असे एकूण ४० हजार रुपये काढल्याची बाब लक्षात आली. त्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली व पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूरfraudधोकेबाजी