शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात पोस्टमास्तरने केली ९० हजारांची अफरातफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 13:51 IST

पोस्ट मास्तरने ग्राहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांच्या आरडी आणि एसएसए बचत खात्यातील रकमेची परस्पर उचल केली. ही रक्कम ९० हजार रुपये आहे. हा प्रकार सावनेर तालुक्यातील वाघोडा येथे घडला असूून, नुकताच उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देवाघोडा पोस्ट आॅफिसमधील प्रकार खोट्या स्वाक्षऱ्यांद्वारे रकमेची उचल

लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : पोस्ट मास्तरने ग्राहकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून त्यांच्या आरडी आणि एसएसए बचत खात्यातील रकमेची परस्पर उचल केली. ही रक्कम ९० हजार रुपये आहे. हा प्रकार सावनेर तालुक्यातील वाघोडा येथे घडला असूून, नुकताच उघडकीस आला आहे.गंगाधर नत्थूजी ठाकरे, रा. वाघोडा, ता. सावनेर असे आरोपी पोस्ट मास्तरचे नाव आहे. गंगाधर ठाकरे हे मागील काही वर्षांपासून वाघोडा येथील पोस्ट आॅफिसमध्ये पोस्ट मास्तरपदी कार्यरत आहेत. वाघोडा आणि परिसरातील काही गावांमधील काही नागरिकांनी पोस्टात आरडी आणि एसएसए खात्यात गुंतवणूक केली आहे. शिवाय, त्यांनी या रकमेचा पोस्ट विभागाकडे नियमित भरणाही केला आहे. दरम्यान, पोस्ट मास्तर गंगाधर ठाकरे यांनी काही ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्या आणि ग्राहकांनी आरडी व एसएसए खात्यात गुंतवलेल्या एकूण ९० हजार रुपयांची परस्पर उचल केली. हा प्रकार लक्षात येताच ग्राहकांनी काटोल उपविभागाचे डाक निरीक्षक शिवम आनंदकुमार शंकर (२५) यांच्याकडे तक्रारी केल्या. या तक्रारी गांभीर्याने घेत शिवम शंकर यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. त्यात गंगाधर ठाकरे यांनी काही ग्राहकांच्या आरडी व एसएसए खात्यातून रकमेची उचल केल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :crimeगुन्हे