शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

चार वर्षीय मुलाने गिळला सेल : ‘सुपर’मध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 22:18 IST

खेळता खेळता चार वर्षीय मुलाने संगणकामधील सेल (बॅटरी) गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून त्याला अज्ञानातून केळ खाऊ घातले. मात्र, सेल बाहेर येण्याऐवजी अन्न नलिकेच्या मुखाजवळ जाऊन फसला. मुलगा अत्यवस्थ झाला. ग्रामीण भागात उपचारानंतर मुलाला नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील गॅस्ट्रोएन्ट्रालॉजीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी मुलाला तपासून विना शस्त्रक्रियेने हा सेल बाहेर काढला.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या कौशल्यामुळे मिळाले जीवनदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खेळता खेळता चार वर्षीय मुलाने संगणकामधील सेल (बॅटरी) गिळला. शौचावाटे तो बाहेर येईल या समजुतीतून त्याला अज्ञानातून केळ खाऊ घातले. मात्र, सेल बाहेर येण्याऐवजी अन्न नलिकेच्या मुखाजवळ जाऊन फसला. मुलगा अत्यवस्थ झाला. ग्रामीण भागात उपचारानंतर मुलाला नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील गॅस्ट्रोएन्ट्रालॉजीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी मुलाला तपासून विना शस्त्रक्रियेने हा सेल बाहेर काढला.आनंद राठोड (४ वर्षे) रा. बारी, जिल्ह्या यवतमाळ असे त्या रुग्णाचे नाव.आनंद घरात खेळत असताना त्याच्या हातात संगणकाचा चपटा सेल लागला. सहज तोंडात ठेवला असताना अचानक तो गिळला गेला. सुरुवातीला आई-वडील रागवतील या धाकाने आनंद गप्प बसला. नंतर पोटात दुखायला लागल्याने त्याने आईला सांगितले. घरच्या मंडळीच्या सल्यानुसार केळी खाऊ घातली. परंतु पोटाचे दुखणे वाढल्याने नातेवाईकांनी पुसद येथील रुग्णालयात दाखविले, तेथून यवमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी नागपूरच्या मेडिकलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. २४ आॅक्टोबर रोजी मेडिकलच्या बालरोग विभागातून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी विभागात भरती केले. डॉ. गुप्ता यांनी आनंदची तपासणी केली. अन्ननलिकेच्या मुखाजवळ सेल फसल्याचे निदान झाले. या घटनेला तीन दिवस झाल्याने सेल सडून काळ्या रंगाचा झाला. शिवाय, सेलमधील रसायनामुळे आतडीला जखमही झाली होती. यामुळे तातडीने सेल काढणे आवश्यक होते. डॉ. गुप्ता यांनी गुरुवारी ‘डबल बलून एन्डोस्कोप’च्या मदतीने कुठलीही दुखापत न करता सेल बाहेर काढला. आतडीत ‘अल्सर’ झाल्याने आनंदला आणखी काही दिवस उपचार घ्यावे लागणार आहे. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. अमोल समर्थ, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. केतकी रामटेके, डॉ. तुषार संकलेचा, डॉ. हरीश कोठारी, सोनेल गट्टेवार, सायमन माडेवार, विकास अंबुलकर, रेखा केणे यांनी सहकार्य केले. 

अत्याधुनिक दुर्बिणीचा वापरही शस्त्रक्रिया साध्या दुर्बिणीद्वारे शक्य नव्हती. त्यासाठी ‘डबल बलून इंडोस्कोपी’चा आधार घेण्यात आला. ही दुर्बिण अत्यंत अचूकतेने काम करते. पंतप्रधान आरोग्य योजनेंतर्गत मिळालेल्या या वैद्यकीय उपकरणामुळे यापूर्वी देखील अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे गरिबांना अत्यंत माफक दरात ही उपचार पद्धती शक्य झाली आहे. - डॉ. सुधीर गुप्ताविभाग प्रमुख, गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnagpurनागपूर