नागपूर : विदर्भात दुसऱ्या दिवशीही चार हजारावर रुग्णसंख्या गेली. शुक्रवारी ४,२३५ रुग्ण व ३७ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ३,६१,८६९ झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आज १,९५७ रुग्ण व १५ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांसोबतच मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. नागपूर शहरात शनिवारपासून नऊ दिवस लॉकडाऊन आहे. याचा किती प्रभाव रुग्णसंख्येवर होतो, याकडे प्रशासनाचे लक्ष लागलेले आहे. नागपूरनंतर बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. ५३७ रुग्ण व ७ मृत्यू झाले. या शिवाय, अमरावती जिल्ह्यात ४४८ रुग्ण व २ मृत्यू, अकोला जिल्ह्यात ३५३ रुग्ण व ४ मृत्यू, यवतमाळ जिल्ह्यात ३६५ रुग्ण व ३ मृत्यू तर वर्धा जिल्ह्यात १५६ रुग्ण व ४ मृत्यूंची भर पडली. विदर्भात रुग्णसंख्या वाढत असल्याने शासकीय रुग्णालयांतील खाटाही भरू लागल्या आहेत. अमरावती व अकोल्यातील गंभीर रुग्ण नागपुरात येत आहेत.
जिल्हा : रुग्ण : ए. रुग्ण : मृत्यू
नागपूर : १,९५७ : १,६५,९८९ : १५
चंद्रपूर : ७५ : २४,५५६ : ०१
गोंदिया : २६ : १४,६६६ : ००
भंडारा : ७५ : १४,१९३ : ००
वर्धा : १५६ : १४,३९८ : ०४
गडचिरोली : २१ : ९,८१७ : ००
यवतमाळ : ३६५ : २०९१९ : ०३
बुलढाणा : ५६७ : २४,१०७ : ०७
वाशिम : १९२ : १०,९०४ : ०१
अकोला : ३५३ : २०,५८९ : ०४
अमरावती : ४४८ : ४१,७३१ :०२