शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात हत्तीपायाचे चार हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 20:08 IST

नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे.

ठळक मुद्देशहरातही ८८७ रुग्णांची नोंद : जिल्हाभर यंत्रणाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यामध्ये २०१९ मध्ये झालेल्या आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची नोंद झाली आहे; तर मागील वर्षात २१ नवीन रुग्णांची यात भर पडली आहे. या रुग्णांवरील उपचारासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या अंतर्गत २ मार्चपासून उपचार मोहीम राबविली जाणार आहे. असे असले तरी सर्व जिल्हाभर हत्तीपाय दुरीकरणासाठी यंत्रणा मात्र नाही.हत्तीपाय आणि हायड्रोसिल या दोन्ही आजारांचा जवळचा संबंध आहे. नागपूर जिल्ह्यात ४,०९६ हत्तीपाय रुग्णांची रुग्णांची नोंद असून, या निम्मे म्हणजे २,१९१ हायड्रोसिल रुग्णांची नोंद झाली आहे तर नव्या २१ रुग्णांच्या रक्तांमध्ये हे जंतू आढळले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील ३८ प्रभागांमध्येही ही रुग्णसंख्या अधिक आहे. शहरात ८८७ हत्तीपाय रुग्ण असून, हायड्रोसिलचे ५० रुग्ण आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये उमरेड, विमानतळाचा काही भाग, कामठी, भिवापूर, सावनेर, कुही मांढळ, रामटेक या तालुक्यामध्ये हत्तीपायाचे रुग्ण अधिक आहेत. आरोग्य विभागाकडून उपलब्ध असलेल्या यंत्रणेकडून फक्त या भागातच हत्तीपाय दुरीकरणाची मोहीम राबविली जाते. अन्य ठिकाणी रुग्ण कमी असल्याची नोंद असल्याने उर्वारित भागात यंत्रणा कार्यरत नाही. त्यामुळे या भागातील रुग्ण स्वत:हून तपासणीला आले किंवा आरोग्य विभागाच्या तपासणी मोहिमेत आढळले तरच या रुग्णांची नोंद होते, ही वस्तुस्थिती आहे.केंद्राच्या सूचनेनुसार, यंदा २ मार्च ते १२ मार्च या काळात हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात मोहीम राबविली जात आहे; नंतरचे पुढील पाच दिवस मॉकअप राऊंड घेतला जाणार आहे. या मोहिमेत निवडलेल्या गरोदर माता, दोन वर्षांखालील बालके, अति गंभीर रुग्ण वगळता गोळ्यांची मात्रा खाऊ घातली जाणार आहे.हत्तीरोग दुरीकरणासाठी जिल्ह्यात मोहीम सुरू होत असून, आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्यासमक्ष गोळ्या देणार आहेत. या औषधोपचारानंतर किरकोळ गुंतागुंत आढळली तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. औषधाचे फारसे गंभीर दुष्परिणाम नसतात. तरीही अशी गुंतागुंत आढळल्यास आरोग्य संस्थेच्या पातळीवर शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे.डॉ. राहुल गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी, नागपूरजंतु रात्री असतात सक्रियहत्तीपायाचे जंतू रात्रीच अधिक सक्रिय असतात. त्यामुळे रक्तनमुने रात्रीच घेतले जातात. एखाद्या रुग्णाला हत्तीपायाचा आजार जडल्यास रुग्णाच्या शरीरात १५ वर्षांपर्यंत जंतु सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे हत्तीपायाचा आजार झाल्याचे वेळीच लक्षात येत नाही. मात्र थंडी वाजून ताप येणे, जांघेत गाठी येणे अशी लक्षणे रुग्णामध्ये वारंवार दिसायला लागतात.

 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर