शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार कोटींच्या कर्ज थकबाकीचे प्रकरण : पद्मेश गुप्ताची काही संपत्ती जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 20:51 IST

तब्बल चार हजार कोटींची थकबाकी असलेल्या व वारंवार नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागपुरातील उद्योजक पद्मेश गुप्ता यांची काही संपत्ती शुक्रवारी प्रशासनातर्फे जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देसीताबर्डीतील एक फ्लॅट व वाडीतील तीन भूखंडांचा समावेश 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल चार हजार कोटींची थकबाकी असलेल्या व वारंवार नोटिसांकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागपुरातील उद्योजक पद्मेश गुप्ता यांची काही संपत्ती शुक्रवारी प्रशासनातर्फे जप्त करण्यात आली. सीताबर्डीतील एक फ्लॅट आणि वाडीतील तीन भूखंडाचा यात समावेश आहे. प्रशासनाने ही संपत्ती जप्त करून बँकेच्या स्वाधीन केली.हजारो कोटीचे कर्ज परत न केल्याने नागपुरातील उद्योजक पद्मेश गुप्ता, अनुराधा गुप्ता, पीयूष मारोडिया यांची संपत्ती जुप्त करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाने १६ जुलै २०१९ रोजी काढले होते. या आदेशानंतर तहसीलदार कार्यालयाकडून सात दिवसात थकबाकी भरण्याची नोटीस काढण्यात आली. या नोटीसीनंतरही थकबाकी न भरल्यानंतर नायब तहसीलदार सुनील साळवे यांच्या पथकाने जप्तीची कारवाई केली. यावेळी बँकेचे अधिकारीही होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गुप्ता यांनी बँक ऑफ इंडिया (लीड बँक), इंडियन ओव्हरसिस बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँ. लि., अलाहाबाद बँक, विजया बँक, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआयआय या बँकांकडून २ हजार ५४७ कोटी २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. २६ फेब्रुवारी २०१८ रोजी बँकांनी थकबाकीदाराला दिलेल्या नोटिसीनुसार कर्जाचा आकडा ३ हजार ३२१ कोटी २२ लाख ३९ हजार २११ पर्यंत गेला हेता. वारंवार नोटीस देऊनही कर्जाची परतफेड न केल्याने हा आकडा आता ४ हजार कोटींच्या घरात गेला आहे. जप्त करण्यात आलेल्या संपत्तीचे मूल्य थकबाकीच्या रकमेपेक्षा खूप कमी आहे. तेव्हा इतर थकबाकी केव्हा वसूल होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

 

टॅग्स :bankबँकnagpurनागपूर