शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विमा रुग्णालयाला मिळाले चार स्पेशालिस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 00:15 IST

कामगार विमा रुग्णालयात साधारण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे. यातच चार विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टरांचे कंत्राट ४ आॅक्टोबर रोजी संपले. यामुळे रुग्णालय अडचणीत आले होते. याची दखल राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) जिल्हा सचिव मुकुंद मुळे यांनी घेतली. वरिष्ठांकडे त्याचा पाठपुरावा केला. यामुळे चारही डॉक्टरांचे कंत्राट नूतनीकरणाला नुकतीच मंजुरी मिळाल्याने रुग्णालय प्रशासनासह कामगार रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

ठळक मुद्देइंटकचा पुढाकार : ५० टक्के रिक्त पदांवर भरती कधी?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगार विमा रुग्णालयात साधारण ५० टक्क्यांपेक्षा जास्त मनुष्यबळ नाही. याचा फटका रुग्णांना बसत आहे. यातच चार विशेषज्ञ (स्पेशालिस्ट) डॉक्टरांचे कंत्राट ४ आॅक्टोबर रोजी संपले. यामुळे रुग्णालय अडचणीत आले होते. याची दखल राष्ट्रीय मजदूर काँग्रेसचे (इंटक) जिल्हा सचिव मुकुंद मुळे यांनी घेतली. वरिष्ठांकडे त्याचा पाठपुरावा केला. यामुळे चारही डॉक्टरांचे कंत्राट नूतनीकरणाला नुकतीच मंजुरी मिळाल्याने रुग्णालय प्रशासनासह कामगार रुग्णांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.सोमवारी पेठ येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात वर्षाकाठी पाच लाख कामगार उपचार घेतात. या रुग्णालयावर १२ लाख कामगारांचे कुटुंब अवलंबून आहे. मात्र रुग्णालयात सोयीबाबत शासन उदासीन असल्याने याचा फटका गरीब रुग्णांना बसत आहे. औषधांच्या तुटवड्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यातच तज्ज्ञ डॉक्टरांची रिक्त पदे व अद्ययावत सोयींच्याअभावी कामगार रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. रुग्णालयाचा एकेक विभागही बंद पडत चालला आहे. यात चार विशेषज्ञ डॉक्टरांचे कंत्राट गेल्याच महिन्यात संपले. रुग्णसेवाच कोलमडली होती. परंतु काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन त्याचा पाठपुरावा केला. परिणामी, कंत्राट नूतनीकरण करून रुग्णसेवेवर होणार परिणाम टळला. नियुक्त करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये डॉ. आदित्य परिहार (छातीतज्ज्ञ), डॉ. अशोक लवंगे (अस्थितज्ज्ञ), डॉ. भाग्यश्री (कान, नाक, घसा तज्ज्ञ) आणि डॉ. मधुकर दुपारे यांचा समावेश आहे. आता काळे यांनी शिल्लक ५० टक्के पद भरतीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामगार रुग्णांकडून होत आहे.

नासुप्रने जागा द्यावीविमा रुग्णालयाच्या बाजूला १६ हजार चौरस फूट जागा असून, ही जागा विमा रुग्णालयाच्या विस्तारासाठी शासनाने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मुळे यांनी केली आहे. सध्या ही जागा नागपूर सुधार प्रन्यासच्या अखत्यारित आहे. जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुधार प्रन्यासकडे पत्रव्यवहार केला आहे. ही जागा उपलब्ध झाल्यास कामगार रुग्णांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतील, असे मुळे यांनी सांगितले

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी