शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

नागपुरात किराणा दुकानासह चार दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 19:01 IST

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन किराणा दुकाने आणि गणेशपेठमधील एक मेडिकल स्टोअर्स अशी चार दुकाने एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी खळबळ उडविली आहे.

  लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन किराणा दुकाने आणि गणेशपेठमधील एक मेडिकल स्टोअर्स अशी चार दुकाने एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी खळबळ उडविली आहे.

शुक्रवारी सकाळी दुकान फोडीच्या या घटना उघडकीस आल्या. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मस्कासाथ परिसरात चोरट्यांनी आजूबाजूला असलेल्या कल्पेश ट्रेडर्स, संजय ट्रेडर्स आणि तुलसी खंडवी अशा तिघांची किराणा दुकाने गुरुवारी रात्री फोडली. विशेष म्हणजे, चोरट्यांनी या दुकानातील किराणा किंवा खाद्यपदार्थाच्या वस्तूला हातही लावला नाही. त्यांनी तीनही दुकानातील एकूण दहा हजार रुपये चोरून पळ काढला.विशेष म्हणजे, तीनही दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि ही चोरी केली. शुक्रवारी सकाळी चोरीच्या या घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील व्यापाऱ्यात खळबळ उडाली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून तहसील पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

अशाच प्रकारे कॉटन मार्केट चौकातील कैलास ओमप्रकाश साधवानी यांचे प्रकाश मेडिकल फोडले. आतमधील डिओ, फेस वॉश आणि अन्य सौंदर्य प्रसाधनांसह रोख दोन हजार रुपये, असा एकूण २९ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. दुकानातील सीसीटीव्हीत चोरीचे चित्रण झाले आहे. त्यानुसार गुरुवारी रात्री ११ वाजून २० मिनिटांनी चोरटा दुकानाच्या छतावरील टिन उचकटून आत शिरला. त्याने दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त करून रोख तसेच सौंदर्यप्रसाधने लंपास केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर साधवानी यांनी गणेशपेठ पोलिसांकडे तक्रार नोंदविली. पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ओळख पटवून चोरट्याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर