शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:07 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम ठेवून त्याविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. घटनेच्या वेळी आरोपी कर्मचारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

ठळक मुद्देहायकोर्ट : राज्य सरकारचे अपील फेटाळलेनागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीतील मृत्यू प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सदोष मनुष्यवधाच्या प्रकरणात चार पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्दोषत्व कायम ठेवून त्याविरुद्ध राज्य सरकारने दाखल केलेले अपील फेटाळून लावले आहे. घटनेच्या वेळी आरोपी कर्मचारी गणेशपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.राजेंद्र गुलाब बोलधन (५३), जिरालाल नर्मदाप्रसाद दुबे (५५), अरविंद प्रल्हाद सराफ (५२) व वसंत कवडू आडे (६६) अशी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. आडे पोलीस निरीक्षक, सराफ पोलीस उपनिरीक्षक, दुबे हेड कॉन्स्टेबल तर, बोलधन कॉन्स्टेबल होते. त्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले होते. त्यामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.२८ आॅक्टोबर २००३ रोजी गणेशपेठ पोलिसांना बजेरियामधील वाजपेयी मंदिराजवळ भांडण सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर बोलधन व दुबे यांनी मनोज वर्मा यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. राजेश यादव यांच्या तक्रारीवरून वर्मा यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९४ व ५०६ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. दरम्यान, रात्री ८.१५ च्या सुमारास वर्मा यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यांना मेडिकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वर्मा यांचे भाऊ सुजित यांच्या तक्रारीनंतर आवश्यक चौकशी करून पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा व अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPoliceपोलिस