शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात छेडखानीवरून सशस्त्र हल्ला , एकाच कुटुंबातील तिघांसह चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 23:35 IST

बहिणीची छेड काढण्याचा आरोप लावून एका तरुणाच्या घरावर सशस्त्र आरोपीच्या टोळक्याने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी चाकू तसेच तलवारीने वार केल्याने सुनील अजित कोंडवाले (वय २३) हा, त्याची आई, वडील आणि मामा जबर जखमी झाले. या हल्ल्यामुळे जरीपटक्यातील गुरु तेगबहादूर सिंग नगरात शुक्रवारी रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देतेगबहादूरनगरात तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बहिणीची छेड काढण्याचा आरोप लावून एका तरुणाच्या घरावर सशस्त्र आरोपीच्या टोळक्याने जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात आरोपींनी चाकू तसेच तलवारीने वार केल्याने सुनील अजित कोंडवाले (वय २३) हा, त्याची आई, वडील आणि मामा जबर जखमी झाले. या हल्ल्यामुळे जरीपटक्यातील गुरु तेगबहादूर सिंग नगरात शुक्रवारी रात्री प्रचंड तणाव निर्माण झाला होता.दीपक ऊर्फ गोलू देशराज राजपूत (वय २२) त्याचे वडील देशराज राजपूत (वय ४८, रा. कडू ले-आऊट), हनी दीपक ठाकूर (रा. नारी रोड), राकेश राजपूत (वय २५, नारी), रफ्तार, राकेश आणि विक्की ठाकूर (वय २८, रा. गुरु तेगबहादूर नगर) अशी आरोपींची नावे आहेत. दीपक आणि सुुनीलचा काही दिवसांपासून वाद सुरू आहे. सुनील हा बहिणीची छेड काढतो, असा आरोप करून दीपकने शुक्रवारी रात्री सुनीलसोबत वाद घातला. त्यांच्यात हाणामारी झाली. यावेळी सुनीलच्या डोक्याला जबर दुखापत झाली. मात्र, आपसातील वाद म्हणून बँडेज करून घेतल्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार देण्याचे टाळले.यानंतर शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास दीपक, त्याचे वडील आणि उपरोक्त साथीदारांनी सुनीलच्या घरावर हल्ला चढवला. त्याला शिवीगाळ करीत चाकू आणि तलवारीने मारहाण केली. मुलाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून सुनीलची आई सुनिता तसेच वडील अजित आणि मामा महेंद्र राजपूत यांना मारहाण करून आरोपींनी त्यांच्यावरही तलवार तसेच चाकूचे घाव घातले. शिवीगाळ, आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यामुळे आरोपी पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच जरीपटक्याचे पोलीस तेथे पोहचले. तोपर्यंत तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. जखमींना मेयोत दाखल करण्यात आले. सुनील कोंडवालेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. ठाणेदार पराग पोटे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शनिवारी रात्री मुख्य आरोपी दीपक राजपूतचे वडील देशराज आणि राकेश ठाकूर या दोन आरोपींना अटक केली. अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे.हॅप्पी दिवाळीने झाली वादाला सुरुवातजरीपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि जखमी एकमेकांच्या दूरच्या नात्यात लागतात. त्यांचे एकमेकांकडे जाणे-येणेही होते. दिवाळीच्या दिवशी सुनीलने आरोपीच्या बहिणीला दिवाळीच्या शुभेच्छा देताना ‘हॅप्पी दिवाळी’ असे म्हटले. येथूनच वादाला सुरूवात झाली अन् त्याचे पर्यवसान या प्राणघातक हल्ल्यात झाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर