शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर अग्निशमन विभागाच्या ताफ्यात चार मिनी फायर टेंडर दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:58 IST

शहरातील वर्दळीच्या व बाजार भाग असलेल्या इतवारी, महाल, गांधीबाग, लालगंज यासह अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यांतील आग नियंत्रणसाठी उपयोगी ठरणारे चार मिनी फायर टेंडर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.

ठळक मुद्देवर्दळीच्या व अरुंद रस्ते असलेल्या भागातील आग नियंत्रणासाठी मदत होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वर्दळीच्या व बाजार भाग असलेल्या इतवारी, महाल, गांधीबाग, लालगंज यासह अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यांतील आग नियंत्रणसाठी उपयोगी ठरणारे चार मिनी फायर टेंडर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. या टेंडरमुळे अशा भागांमध्ये आग आटोक्यात आणताना मदत होणार आहे.या टेंडरला जास्त पाणी वाहून नेणारे ब्राऊझर लावल्यास अधिक पाणी क्षमतेचा एकाच वाहनातून योग्य तो वापर करून मोठी आगहानी टाळता येईल. आतापर्यंत दलात 'स्वराज माझदा' या मिनी टेंडरचा वापर केला जात होता. अधिक क्षमतेचा पंप लागलेल्या या मिनी फायर टेंडरची पाणी वाहून नेण्याची क्षमता २ हजार लिटर एवढी आहे. शहराचा व्याप विचारात घेता चार टेंडर शहरासाठी पुरेसे आहेत. दरवर्षी यात चार टेंडरची भर पडेल. त्यावेळी नव्या अग्निशमन केंद्रात त्या ठेवण्यात येतील.या टेंडरसाठी दोन वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या होत्या. यापूर्वीच्या मिनी फायर टेंडरला २० वर्षे झाली होती. त्या आता कामात पडत नव्हत्या. या मिनी फायर टेंडर आत गल्लीत गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे दुसरे मोठे फायर टेंडर नेण्याची गरज भासणार नाही. एक मोठे ५ हजार ते १६ हजार लिटर क्षमतेचे ब्राऊझरचा पाईप या टेंडरमध्ये टाकल्यावरही किमान चार पंपाचे काम भागू शकेल. नागपूर शहरात एका गल्लीत एक टेंडर गेल्यावर त्यामागे दुसरे वाहन अशी गर्दी व्हायची. त्यामुळे आग विझविण्यासाठीही काही मर्यादा असायच्या. आता वाहनांची गर्दी होणार नाही. शिवाय, अनेक तास सतत आगीवर पाण्याचा मारा करता येणे शक्य होणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली.लवकरच दोन ब्राऊजरही येणारकिमान चार मोठे टँकरची पाणी क्षमता असणारे तब्बल १६ हजार लिटर पाण्याची क्षमता असलेले ब्राऊझरही प्रस्तावित आहेत. या ब्राऊजरच्या दरनिश्चितीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. दरनिश्चितीला मंजुरी मिळाल्यानंतर दोन ब्राऊजरही पुढील वर्षी विभागात दाखल होऊ शकतात. मिनी फायर टेंडर गल्लीत गेल्यानंतर या ब्राऊजरचा पाईप टेंडरच्या टाकीत टाकल्यास किमान चार वाहनांच्या पाणी क्षमतेचा मारा आगीवर करता येणे शक्य होईल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfireआग