शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या चार वकिलांची हायकोर्ट न्यायमूर्तिपदी नियुक्तीची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:29 IST

Nagpur : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमचा केंद्र सरकारला प्रस्ताव

नागपूर : कॉलेजियमने मंगळवारी केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रस्ताव सादर करून नागपूर येथील अॅड. मेहरोज अश्रफ खान पठाण, अॅड. राज दामोदर वाकोडे, अॅड. नंदेश शंकरराव देशपांडे व अॅड. रजनीश रत्नाकर व्यास, या चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली. केंद्र सरकारने ही शिफारस मंजूर केल्यानंतर चारही वकील अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्त होतील.

अॅड. मेहरोज खान पठाण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये राज्य सरकारचे वकील आहेत, तर अॅड. नंदेश देशपांडे डेप्युटी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया (केंद्र सरकार) आहेत. अॅड. राज वाकोडे व अॅड. रजनीश व्यास खासगी वकिली करतात. या चारही विधिज्ञांना वकिली व्यवसायाचा दीर्घ अनुभव आहे. यादरम्यान त्यांनी संवैधानिक, दिवाणी, फौजदारी इत्यादी प्रकरणे यशस्वीपणे हाताळली आहेत. त्यांची आतापर्यतची यशस्वी कारकीर्द लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने त्यांना न्यायमूर्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एकूण १४ वकिलांची शिफारससर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूर येथील चौघांसह एकूण १४ वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. इतर वकिलांमध्ये अॅड. संदेश पाटील, अॅड. श्रीराम सिरसाट, अॅड. रणजीतसिंह राजा भोसले, अॅड. आशिष चव्हाण, अॅड. फरहान दुबाश, अॅड. आबासाहेब शिंदे, अॅड. हितेन वेणेगावकर, अॅड. अमित जामसांदेकर, अॅड. वैशाली पाटील-जाधव व अॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या  कॉलेजियमने या सर्व वकिलांची मंगळवारी मुलाखत घेतली. या वकिलांची अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सर्वोच्च न्यायालयाला शिफारस केली होती. 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय