दुर्घटनेचा धोका : पथदिव्यांच्या खांबांसह उघड्यावर केबलनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नागपूर शहरात विकासाच्या विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. परंतु यात रिलायन्स कंपनीने शहराच्या काही भागातील पथदिव्यांच्या खांबावर फोर - जी केबल टाकल्याने सुंदरतेला ग्रहण लागले आहे.केबल टाकण्यासाठी आधी कंपनीने शहरात ठिकठिकाणी खोदकाम केले. नागरिकांच्या विरोधानंतर मनपा प्रशासनाने कठोर भूमिका घेत खोदकामावर मर्यादा आणल्या. परंतु पथदिव्यांच्या खांबावर टाकलेला केबल खाली झुकल्यास अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पूर्व- पश्चिम व उत्तर-दक्षिण भागातील प्रमुख मार्गावर पथदिव्यांच्या खांबावर केबल टाक ण्यात आले आहे. मार्गाच्या दुभाजकावरून केबल गेल्याने व एका चौकातून दुसऱ्या चौकाकडे वळण घेतल्यानंतर काही ठिकाणी केबल खाली झुकलेले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अनेकदा अडचणीचा सामना करावा लागतो. टाकण्यात आलेले केबल डिसेंबर २०१५ पर्यंतच राहणार आहे. त्यानंतर हटविण्यात येईल, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. फोर जी नेटवर्कसाठी भूमिगत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच पथदिव्यावरील केबल हटविले जाणार आहे. यामुळे कोणताही अडथळा होत नाही. जेथे केबल खाली झुकलेले आहे, ते तातडीने दुरुस्त केले जातात, असा दावा रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.तात्पुरती अनुमतीरिलायन्स कंपनीचे भूमिगत लाईन टाकण्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात पथदिव्यांच्या खांबावरून केबल टाकण्याला अनुमती देण्यात आली आहे. १५ डिसेंबर नंतर केबल हटविण्यात येईल. केबल खाली झुकल्यास वा तुटल्यास तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावर मनपाचे लक्ष आहे. भूमिगत केबल सोबतच कंपनीने मायक्रोवेब टेक्नॉलॉजीवर आधारित ओव्हरहेड केबल टाकण्याची अनुमती मागितली होती. त्यामुळे ही अनुमती देण्यात आली आहे. पावसाळ्यामुळे सध्या काम बंद आहे.संजय जयस्वाल, कार्यकारी अभियंता (विद्युत)नागपूर महानगरपालिकाकाम झाल्यावर केबल काढूभूमिगत लाईन टाकण्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात पथदिव्यांच्या खांबावरून केबल टाकण्यात आले आहे. ते मायक्रोवेब टेक्नॉलॉजीवर काम करतात. भूमिगत केबलचे काम पूर्ण होताच हे केबल काढण्यात येतील. या केबलची वारंवार पाहणी केली जाते. गरज भासल्यास दुरुस्ती केली जाते. एक अधिकारी, रिलायन्स कंपनी
उपराजधानीला ‘फोर-जी’चे ग्रहण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2015 03:13 IST