शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चार मोठ्या व्यापाऱ्यांनी काढले दिवाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 23:53 IST

शहरातील चार मोठ्या व्यापाऱ्यांनी दिवाळे काढल्याने व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची देणी आहे. त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी कर्ज देणाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. लोकमतकडे या सर्व व्यापाऱ्यांची नावे आहेत. परंतु सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल नसल्याने नाव प्रकाशित केले जात नही.

ठळक मुद्देबाजारपेठेत खळबळ : राजकीय पक्षांशी संबंधित व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपये डुबवलेलोखंड, आॅटोमोबाईल व हॉटेल व्यावसायिकांनी केले हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील चार मोठ्या व्यापाऱ्यांनी दिवाळे काढल्याने व्यापारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्यांवर कोट्यवधी रुपयांची देणी आहे. त्यांच्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी कर्ज देणाऱ्यांना स्पष्ट सांगितले आहे. लोकमतकडे या सर्व व्यापाऱ्यांची नावे आहेत. परंतु सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल नसल्याने नाव प्रकाशित केले जात नही.या व्यापाऱ्यांपैकी एकजण मोठ्या राजकीय पक्षाशी जुळलेला आहे. तो या पक्षाच्या एका आघाडीचा मोठा नेताही आहे. कळमना बाजारातील सूत्रानुसार या व्यापाऱ्यावर तब्बल ३५ कोटी रुपयाचे देणे आहे. १५ कोटी रुपयाची देणी उघडकीस आली आहे. यात सव्वादोन कोटी रुपये बँकेचे कर्ज आहे. यासोबतच त्याच्यावर दोन दलाल आणि काही व्यापाºयांसह नातेवाईकांचीही देणी आहेत. आता त्याचे म्हणणे आहे की, कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नाहीत. काही संपत्ती आहे. हा व्यापारी संपत्ती देऊन हिशेब चुकता करू इच्छित आहे. परंतु त्याने संपत्तीची जी किंमत मोजली आहे, ती बाजारभावापेक्षा कितीतरी अधिक आहे. अशा परिस्थितीत व्यापारी त्याच्या घराच्या चकरा मारत आहेत. यादरम्यान एका कर्जदात्याने पैसे वसुलण्यासाठी त्याचे कळमना बाजार येथील दुकान पैसे न देताच खरेदी केले आहे.या व्यापाऱ्याचा मोठा दबदबा राहिलेला आहे. राजकीय पक्षाशिवाय समाजाशी संबंधित संघटनेचा अध्यक्षही आहे. कळमना बाजाराच्या राजकारणाशीही तो जुळलेला आहे. गेल्या महापलिकेच्या निवडणुकीत एका उमेदवाराचा तो अतिशय खास होता. तो उमेदवार आता त्याची मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे.या व्यापाऱ्याशिवाय शहरातील इतर तीन मोठ्या व्यापाऱ्यांनी सुद्धा दिवाळे काढले आहे. सर्वात अगोदर रामदासपेठ येथील लोखंडाच्या एका मोठ्या व्यापाऱ्याने दिवाळे घोषित केले आहे. त्याच्यावर जवळपास २०० कोटी रुपयाची देणी असल्याचे सांगितले जात आहे. त्याने नोटबंदीदरम्यान मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम एक्सेंजच्या नावावर जमा केली होती. याशिवाय शहरातील एक मोठा आॅटोमोबाईल व्यापारीही संकटात आहे. एक हॉटेल व्यावसायिकाचेही वाईट दिवस आहे. दोघांवरही लोकांची मोठी देणी आहे. त्यांनी मूळ रक्कम सुविधेनुसार परत करण्याचे आश्वासन देत व्याजातून मुक्त करण्यास सांगितले आहे.कपडे आणि जोडेराजकीय पक्षाशी जुळलेल्या व्यापाऱ्याचा मुख्य व्यवसाय धान्य आणि मसाल्याशी संबंधित आहे. परंतु अलीकडे तो कपड्यांच्या व्यवसायाशीही जुळलेला आहे. भंडारा रोडवर त्याने एक बुटीक उघडल्यानंतर जरीपटक्यातही दुकान उघडले आहे. कपड्यांचा व्यवसाय तो आपली मुलं आणि भावांच्या नावावर करीत आहे. सूत्रांनुसार या व्यापाऱ्याने अलीकडेच चीनवरून १ कोटी २० लाखाचे जोडे आणि वॉलपेपर सुद्धा आणले. या व्यापऱ्याच्या जवळच्या नातेवाईकाने अलीकडे आयात-निर्यातीचा व्यापारही सुरू केला आहे. या व्यवसायात ही रक्कम लावण्याची शंका व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर