लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : शहरातील विविध भागांतून गॅस सिलिंडर व दुचाकी चाेरणाऱ्या चाेरट्यांना वाडी पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चाेरीच्या सिलिंडरसह दुचाकी हस्तगत करण्यात आली.
दत्तवाडीतील अग्रवाल गॅस एजन्सीमध्ये ग्राहक सिलिंडर रिफिल करण्याकरिता गेले होते. सिलिंडर बाजूला ठेवून चिल्लर आणण्यासाठी लगतच्या दुकानात गेले असता, अज्ञात चाेरट्याने सिलिंडर चाेरून नेले. याबाबत राेशन मधुकर पाटील (रा. दाभा) यांच्या तक्रारीवरून पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून आराेपीचा शाेध सुरू केला हाेता. तपासादरम्यान आराेपी दीपक सुरेश शर्मा (२७, रा. महादेवनगर, लाव्हा) यास ताब्यात घेत विचारपूस केली असता, त्याने सिलिंडर चाेरल्याची कबुली दिली तसेच २६ जानेवारी २०२० राेजी डिफेन्स अंगणवाडी क्रमांक १९१ नागलवाडी येथून सिलिंडर चाेरी केल्याचे कबूल केले.
दुसऱ्या घटनेत काेहळे ले-आऊट भागातून ६० लिटर डिझेल चाेरणाऱ्या दाेन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.
वडधामनातील डाेबीनगर येथील नारायण पिसे यांची घरासमोर ठेवलेली एमएच-४०/एस-६६५७ क्रमांकाची दुचाकी रात्री अज्ञात चाेरट्याने चाेरून नेली. पिसे यांच्या तक्रारीवरून तपास सुरू केल्यानंतर पोलिसांना केळकर टाऊन येथे चाेरटे लपून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पाेलिसांनी आराेपी नीलेश राधेश्याम गुजवार (२३, रा. जऊरवाडा, कारंजा), सचिन राजेंद्र गिरी (२१, कळंबपिपरा, साैंसर) व रूपम प्रल्हाद गणाेरकर (२०, रा. रिवा काॅलनी, साैंसर) या तिघांना ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी वाडी पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, तपास सुरू केला आहे.