शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपुरात  साडेचार लाख नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 21:15 IST

नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखांहून नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे१७ महिन्यांतील आकडेवारी : रस्ते अपघातांमध्ये ३४९ जणांचे मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन करण्यासाठी नागरिकांकडूनच पुढाकार घेण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या १७ महिन्यांत नागपुरात वाहतुकीचे नियम मोडल्यासाठी साडेचार लाखांहून नागरिकांविरोधात प्रकरणांची नोंद झाली. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत विचारणा केली होती. नागपुरात १ जानेवारी २०१८ ते ३१ मे २०१९ या कालावधीत किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती हेल्मेट न घालता सापडले, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर किती कारवाई झाली इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०१८ ते २० मे २०१९ या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ४ लाख ५२ हजार ३८ नागरिकांवर कारवाई करण्यात आली. या नागरिकांकडून १० कोटी ७० लाख १३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.१७ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात ३२५ अपघात झाले व यात ३४९ नागरिकांचा बळी गेला. तर आऊटर रिंग रोडवर १७५ अपघातांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाला.सर्व वाहनचालकांमध्ये त्रुटी कशा ?माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार या कालावधीत वाहतूक पोलिसांनी ४ लाख ५२ हजार ३८ वाहनांची तपासणी केली. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व वाहनचालकांवर कारवाई झाली. तपासणी झालेल्या सर्व वाहनचालकांमध्ये त्रुटी कशा काय आढळून आल्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गुन्हा                                कारवाई                  दंड (रुपयांमध्ये)हेल्मेट न घालणे                 ७४,०७४                   २,८६,०९,४००परवाना नसणे                    १६,६५५                   ८१,८९,५००मोबाईलवर बोलणे              १५,१२०                    २३,७४,०००दारु पिऊन वाहन चालविणे २५,४५५                  २,५५,१२,८००वाहतूक सिग्नल तोडणे         ३४,८९४                   ५७,३२,७००हेल्मेट न घालणे ७४ हजार जणांना भोवलेहेल्मेट न घालता दुचाकी चालविण्याप्रकरणी ७४ हजार ७४ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून २ कोटी ८६ लाख ९ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाऱ्या १५ हजार १२० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांना २३ लाख ७४ हजारांचा दंड ठोठाविण्यात आला. वाहन चालविण्याचा परवाना नसतानादेखील गाडी चालवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १६ हजार ६५५ महाभागांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ८१ लाख ८९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तळीरामांकडून अडीच कोटी वसूलमद्यप्राशन करून वाहने चालविताना २५ हजार ४५५ वाहनचालक वाहतूक विभागाच्या तावडीत सापडले. त्यांच्याकडून तब्बल २ कोटी ५५ लाख १२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर वाहतूक सिग्नल तोडणाऱ्या ३४ हजार ८९४ नागरिकांवर कारवाई केली व त्यांच्याकडून ५७ लाख ३२ हजार ७०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसRight to Information actमाहिती अधिकारRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता