शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दैव बलवत्तर होते म्हणून थोडक्यात टळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 20:46 IST

मुलांच्या व्हॅनचा अपघात झाल्याची बातमी कळली, अपघाताचे फोटो व्हायरल झाल्याचे बघितल्यावर अजूनच धक्का बसला. आम्ही तात्काळ शाळेत धाव घेतली. पण मुले सुखरुप होती. कदाचित दैव बलवत्तर होते म्हणून थोडक्यात टळले, अशी भावना धास्तावलेल्या पालकांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देधास्तावलेल्या पालकांनी व्यक्त केल्या भावना : एका विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचारबेसा यथील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आवारातील अपघात प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलांच्या व्हॅनचा अपघात झाल्याची बातमी कळली, अपघाताचे फोटो व्हायरल झाल्याचे बघितल्यावर अजूनच धक्का बसला. आम्ही तात्काळ शाळेत धाव घेतली. पण मुले सुखरुप होती. कदाचित दैव बलवत्तर होते म्हणून थोडक्यात टळले, अशी भावना धास्तावलेल्या पालकांनी व्यक्त केली. शनिवारी सकाळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बेसा येथील विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेला आदी प्रवीण वाघ या विद्यार्थ्यावर सक्करदरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचबरोबर इतर पाच मुले सुखरुप आहेत.स्कूलची व्हॅन मुलांना घेऊन शाळेच्या परिसरात पोहचली होती. काही विद्यार्थी व्हॅनमधून उतरले होते तर काही विद्यार्थी उतरायचे होते. मुले आपापल्या स्कूल बॅग काढत असताना, नियंत्रण सुटलेला एक ट्रक उभ्या व्हॅनवर धडकला. परंतु विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून उतरत असल्याने मोठा घातपात झाला नाही. यात स्वस्तिक शुक्ला, आदी वाघ, स्वरुप चन्ने, तनिष पुरी, स्वरा जांगिड, नव्हांश वानखेडे हे जखमी झाले. या विद्यार्थ्यांना यशोदा रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. काही विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले तर आदी प्रवीण वाघ या विद्यार्थ्याला सक्करदरा येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. आदीच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या कमरेच्या भागातही गंभीर दुखापत झाली आहे. त्याला डॉक्टरांनी दोन महिन्याचा विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आदी हा सातव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. सोमवारपासून त्याची परीक्षा सुरू होणार आहे. त्याची आईसुद्धा त्याच शाळेत शिक्षिका आहे. विशेष म्हणजे आदी आज आईसोबत जाणार होता. परंतु व्हॅन लवकर आल्याने तो व्हॅनमध्ये शाळेत निघून गेला. या अपघातात व्हॅन चालकाचा कुठलाही दोष नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

 

 

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थी